वाचा-
ऑस्ट्रेलिया या वर्षाच्या अखेरीस होणारी आयसीसी टी-२० क्रिकेट स्पर्धा करोनामुळे धोक्यात आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना घरी राहण्याचे आदेश दिले आहेत. गुरुवारी ऑस्ट्रेलियाच्या गव्हर्निंग बॉडीने कर्मचाऱ्यांना २७ एप्रिलपर्यंत घरी राहण्यास सांगितले आहे. या काळात कर्मचाऱ्यांचा २० टक्के पगार कपात केली जाणार असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले.
वाचा-
ऑस्ट्रेलियात ३० जूनपर्यंत बोर्डाचे कामकाज सुरू होण्याची शक्यता सीईओ केव्हिन रॉबडर्स यांनी व्यक्त केली. आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशन यांच्यात खेळाडूना दिल्या जाणाऱ्या मानधनासंदर्भात ऑस्ट्रेलियात चर्चा सुरू आहे.
वाचा-
रिकाम्या मैदानात प्रेक्षकांशिवाय होणार वर्ल्ड कप
करोना संकट असताना देखील क्रिकेट ऑस्ट्रेलिया २०२०-२१च्या कार्यक्रमाबद्दल आशावादी आहे. यात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या आयसीसी टी-२० क्रिकेट स्पर्धेचा समावेश आहे. तर भारतासोबतचा हाय व्होल्टेज दौरा देखील आहे. करोना संकटामुळे भारत दौरा आणि वर्ल्ड कप रिकाम्या स्टेडियमवर खेळवण्याची शक्यता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने व्यक्त केली आहे. अशा प्रकारे सामने खेळवण्याची तयारी देखील त्यांची आहे.
वाचा-
करोनामुळे ऑस्ट्रेलियाने सर्व आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक सामने स्थगित केले आहेत. खेळ लवकर सुरू व्हावेत अशी सर्वांची इच्छा आहे. पण ते कधीही ते कधी सुरू होतील हे निश्चितपणे कोणीही सांगू शकत नाही. जर परिस्थितीत सुधारणा झाली तर सामने होण्यासाठी वेगळा विचार करावा लागले, असे संकेत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिले आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times