पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने गेल्या काही दिवसांमध्ये भारतीयांचा रोष ओढवून घेतला आहे. या गोष्टीची जाणीव आता शोएबला झाली आहे. त्यामुळेच शोएबने आता भारतीयांना खूष ठेवण्यासाठी नवा फंडा शोधून काढला आहे. यासाठी आता अख्तरने चक्क भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मदत घ्यायचे ठरवले आहे.

सचिन आणि अख्तर म्हटले की सर्वांनाच २००३ साली झालेला विश्वचषक आठवतो. या विश्वचषकाच्या सामन्यात भारतीय संघ पाकिस्तानच्या धावसंख्येचा पाठलाग करत होता. त्यावेळी सचिन आणि वीरेंद्र सेहवाग हे सलामीला आले होते. या दोघांपुढे वसिम अक्रम, वकान युनूस आणि अख्तर या वेगवान त्रिकुटाचे आव्हान होते. शोएब या सामन्यात वेगान चेंडू टाकत होता. सचिनही त्याला तोडीस तोड उत्तर देत होता. या सामन्यात सचिनने अख्तरला जे थर्ड मॅनला षटकार खेचले, ते कोणीही विसरू शकत नाही. अख्तरही सचिनने मारलेले हे षटकार विसरू शकलेला नाही.

वाचा-
एका मुलाखतीमध्ये अख्तर म्हणाला की, ” मला २००३ साली झालेल्या विश्वचषकातील भारताविरुद्धचा सामना आठवतो. या सामन्यात सचिनने मला एक खणखणीत षटकार खेचला होता. तो षटकार मी कधीही विसरू शकत नाही. सचिनच्या या षटकाराने १३० कोटी भारतीयांना आनंद झाला होता. जर सचिनच्या षटकाराने १३० कोटी भारतीय जनतेला आनंद होणार असेल तर मी सचिनला रोज एक षटकार मारण्यासाठी संधी देऊ शकतो.”

१९९९ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला शोएब अख्तरच्या गोलंदाजीची तपासणी सुरू असल्याचे कळवले होते. तेव्हा बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जगमोहन डालमिया १९९७-२००० या काळात आयसीसीचे अध्यक्ष होते. संदर्भात बोलताना लेफ्टनंट जनरल (निवृत्त) तौकीर जिया म्हणाले, जगमोहन यांचा आयसीसीमध्ये वजन होते. शोएब अख्तरच्या गोलंदाजी प्रकरणी त्यांनी प्रचंड सहकार्य केले. आयसीसीचे सर्व सदस्य शोएबची गोलंदाजीची अॅक्शन चुकीची असल्याचे सांगत होते. पण डालमिया यांना ते मान्य नव्हते आणि त्यांनी स्वत:ची बाजू लावून धरली.

वाचा- ; पण वर्ल्ड कप झाला पाहिजे

जिया १९९९ ते २००३ या काळात पीसीबीचे अध्यक्ष होते. ते म्हणाले, डालमिया यांनी माझ्या सोबत शोएबची बाजू लावून धरली. डालमियांनी घेतलेल्या भूमिकेमुळेच आयसीसीला हे मान्य करावे लागले की, अख्तरच्या उजव्या हातात जन्मजात दोष आहे आणि त्यामुळे त्याला गोलंदाजी करण्यास द्यावी.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here