आतापर्यंत शोएबने बरीच वक्तव्य केली आहे. करोनाशी लढण्यासाठी जो मदत निधी लागेल, त्यासाठी भारत-पाकिस्तान सामने खेळवावे, असे शोएबने म्हटले होते. त्याचबरोबर पाकिस्तानला भारताने १० हजार व्हेंटिलेटर द्यावीत, असेही शोएबने म्हटले होते. आज तर सचिनचा षटकार पाहून भारतीय चाहते खूष होणार असतील तर मी त्याला रोज एक षटकार मारायला देईन, असे म्हटले होते. पण एका मुलाखतीमध्ये शोएबचा खोटारडेपणा समोर आल्याचे दिसून आले आहे.
शोएब म्हणाला की, ” सचिन हा एक महान फलंदाज होता. सचिनला मी आतापर्यंत १२-१३ वेळा बाद केले आहे,” असे वक्तव्य शोएबने केले होते. पण शोएब यावेळी खोटारडेपणा करत असल्याचे सिद्ध झाले आहे. कारण आतापर्यंत शोएबने सचिनला १२-१३ वेळा बाद केले नाही. आतापर्यंत शोएबने सचिनला आतापर्यंत फक्त आठवेळा बाद केले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाच वेळा आणि कसोटी क्रिकेटमध्ये तीन वेळा बाद केले आहे. त्यामुळे आता शोएबचा खोटारडेपणा जगासमोर आला असून चाहते त्याला ट्रोल करत आहेत.
सचिन आणि अख्तर म्हटले की सर्वांनाच २००३ साली झालेला विश्वचषक आठवतो. या विश्वचषकाच्या सामन्यात भारतीय संघ पाकिस्तानच्या धावसंख्येचा पाठलाग करत होता. त्यावेळी सचिन आणि वीरेंद्र सेहवाग हे सलामीला आले होते. या दोघांपुढे वसिम अक्रम, वकान युनूस आणि अख्तर या वेगवान त्रिकुटाचे आव्हान होते. शोएब या सामन्यात वेगान चेंडू टाकत होता. सचिनही त्याला तोडीस तोड उत्तर देत होता. या सामन्यात सचिनने अख्तरला जे थर्ड मॅनला षटकार खेचले, ते कोणीही विसरू शकत नाही. अख्तरही सचिनने मारलेले हे षटकार विसरू शकलेला नाही.
वाचा-
एका मुलाखतीमध्ये अख्तर म्हणाला की, ” मला २००३ साली झालेल्या विश्वचषकातील भारताविरुद्धचा सामना आठवतो. या सामन्यात सचिनने मला एक खणखणीत षटकार खेचला होता. तो षटकार मी कधीही विसरू शकत नाही. सचिनच्या या षटकाराने १३० कोटी भारतीयांना आनंद झाला होता. जर सचिनच्या षटकाराने १३० कोटी भारतीय जनतेला आनंद होणार असेल तर मी सचिनला रोज एक षटकार मारण्यासाठी संधी देऊ शकतो.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times