नवी दिल्ली: क्रिकेटच्या मैदानावर प्रत्येक खेळाडूपासून ते अंपायर यांच्या हलचालींवर नजर ठेवण्यासाठी कॅमेरे असतात. इतक काय तर विकेटमध्ये कॅमेरे असतात. त्यामुळे मैदानावर होणारा प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात टिपला जातो आणि चूक झाली तर ती पकडली जाते. पण जुन्या काळात एखाद दुसऱ्या कॅमेऱ्यावर सामने रेकॉर्ड व्हायचे. अशाच सामन्यात झालेली एक चूक ८३ वर्षानंतर लक्षात आली आहे.

वाचा-
सध्या जगभरात करोना व्हायरसमुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. घरात बसून लोक टीव्ही, मोबाईल, जुन्या मालिका आदी गोष्टी पाहत आहेत. क्रिकेट चाहत्यांसाठी काही जुने सामने दाखवले जात आहेत. अशातच क्रिकेटमधील आकडेवारींची नोंद ठेवणारे मोहनदास मेनन यांनी एका सामन्यातील चूक पडकली आहे. ही चूक होऊन ८३ वर्ष झाली आहेत.

वाचा-

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १९३६-३७ साली झालेल्या अॅशेस मालिकेतील सामन्यात इंग्लंडच्या आर्थर फाग हे पहिल्या डावात शॉर्ट मिडविकेटवर कॅच बाद झाले होते. पण रेकॉर्ड बुकमध्ये फाग यांचा कॅच विकेटकीपर बर्ट ओल्डफील्डने पकडल्याची नोंद आहे.

वाचा- घाबरत नाही

क्रिकेटमधील ८३ वर्षापासून नोंद असलेली ही चूक अखेर मेनन यांनी शुक्रवारी पकडली. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे आणि या घटनेचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या ट्विटवर चाहत्यांनी मेनन यांनी अनेक प्रश्न देखील विचारले आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here