नवी दिल्ली: करोना व्हायरसमुळे भारतासह सर्व देशात लॉकडाऊन आहे. यामुळे क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू घरीच थांबले आहेत. हे क्रिकेटपटू घरातील अनेक गंमतीशीर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. असाच एक व्हिडिओ ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूने शेअर केला असून या क्रिकेटपटूने चक्क हिंदी गाण्यावर डान्स केला आहे.

वाचा-
ऑस्ट्रेलियाचा माजी उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरने त्याच्या मुलीसोबत हिंदी चित्रपटातील सुपर हिट ठरलेल्या शीला की जवानी या गाण्यावर डान्स केला आहे. याचा व्हिडिओ वॉर्नरने इस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ त्याने टिकटॉकवर केला आहे.

वाचा-
क्रिकेट करिअरमध्ये ८४ कसोटी, १२३ वनडे आणि ७९ टी-२० सामने खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या या क्रिकेटपटूने या गाण्यावर डान्स करतानाचे दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. या दोन्ही व्हिडिओत वॉर्नरच्या मुलीने भारतीय पद्धतीचा ड्रेस घातला आहे.

वाचा-
वॉर्नर आणि त्याच्या मुलीने व्हिडिओत कॅटरीना कैफची कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे.

त्याने शेअर केलेल्या पहिल्या व्हिडिओ ५ लाखापेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर दुसरा व्हिडिओ शेअर करताना तो म्हणतो, भारताने मला आणखी एक व्हिडिओ करण्यास सांगितला.

वाचा-

३३ वर्षीय वॉर्नर भारतात स्पर्धेत खेळतो. त्यामुळे त्याने हे गाण ऐकले असावे. वॉर्नरच्या नेतृत्वाखाली हैदराबाद संघाने आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. मुलीच्या सांगण्यावरून त्याने टिकटॉकवर अकाऊंट तयार केले.

वाचा-
करोना व्हायरसपासून बचावासाठी वॉर्नर अन्य क्रिकेटपटूंप्रमाणे कुटुंबासोबत घरीच आहे. याआधीही त्याने लॉकडाऊनच्या काळात घरातील काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here