नवी दिल्ली: भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी क्रिकेटपासून सध्या दूर आहे. धोनी पुन्हा भारतीय संघाकडून खेळेल की नाही याबद्दल शंका आहे आणि खेळला तरी तो फार मोठ्या कालावधीसाठी खेळेल असे वाटत नाही. अशातच धोनीची जागा कोण घेईल असा प्रश्न सर्वांना पडला आहे. धोनी क्रिकेटमधून दूर होण्याआधी ऋषभ पंतकडे धोनीचा उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात होते. पंतने अनेक वेळा संधी मिळाल्यानंतर ही त्याचा उपयोग केला नाही. आता धोनीची जागा घेण्यासाठी दुसरा एक खेळाडू सज्ज झाला आहे आणि त्याचा आज वाढदिवस आहे.

वाचा-
गेल्या काही दिवसात धोनीचा पर्याय म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिले जात आहे त्याचे नाव आहे . आज १८ एप्रिल रोजी राहुल २८वा वाढदिवस साजरा करत आहे. गेल्या काही महिन्यात राहुल भारतीय संघाचा स्टार फलंदाज झाला आहे. विशेषत: ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत त्याने केलेल्या कामगिरीमुळे.

राहुलने २०१४ मध्ये कसोटीत पदार्पण केले होते. सुरुवातीला सहा सामन्यात त्याने ३ शतकी खेळी केली होती. पण सिडनी, कोलंबो आणि किंग्स्टन येथे शतक करणाऱ्या राहुलला वनडे संघात स्थान मिळण्यास दोन वर्ष वाट पाहावी लागली.

वाचा-
जुलै २०१६ ते मार्च २०१७ या काळात राहुलने १२ कसोटी सामन्यात ५५.५२च्या सरासरीने ९४४ धावा केल्या आहेत. भारतीय भूमीवर खेळलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात राहुलने इंग्लंडविरुद्ध १९९ धावांची खेळी केली होती.

२०१४ मध्ये राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न मैदानावर पहिला कसोटी सामना खेळला होता. योगायोग म्हणजे धोनीचा हा शेवटचा कसोटी सामना होता. राहुलला पहिल्या कसोटीत ३ आणि फक्त १ धाव करता आली. ऑस्ट्रेलियात खेळलेल्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर राहुलने दुसऱ्या सामन्यात ओपनर म्हणून फलंदाजी केली होती. या सामन्यात त्याने ११० धावा केल्या. तर २०१६ मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध वनडेत पदार्पण केले. या सामन्यात राहुलने नाबाद १०० धावा केल्या. राहुलने ओपनर म्हणून कसोटी आणि वनडेतील पहिल्या सामन्यात शतकी खेळी केली आहे.

वाचा-

कसोटी, वनडे आणि टी-१० अशा तिनही प्रकारात शतक करणारा तो तिसरा भारतीय आहे. राहुल वगळता सुरेश रैना, रोहित शर्मा यांनी अशी कामगिरी केली आहे. टी-२० फक्त २० डावात शतक करण्याचा विक्रम राहुलच्या नावावर आहे. याआधी हा विक्रम पाकिस्तानच्या अहमद शहजादच्या नावावर होता. त्याने ७६ डावात ही कामगिरी केली होती.

वाचा-
आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक राहुलच्या नावावर आहे. त्याने पंजाबकडून खेळताना दिल्लीविरुद्ध १४ चेंडूत ४ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने अर्धशतक केले होते.

वाचा-

गेल्या काही सामन्यात राहुलने फलंदाजी बरोबरच एक विकेटकिपर म्हणून शानदार कामगिरी केली आहे. त्यामुळेच धोनीचा पर्याय म्हणून ज्या खेळाडूंकडे पाहिले जात आहे त्यात राहुलचे नाव आघाडीवर आहे. त्याने ३६ कसोटीत ५ शतक आणि ११ अर्धशतकासह २ हजार ६ तर ३२ वनडे सामन्यात ४ शतक आणि ७ अर्धशतकांसह १ हजार २३९ धावा केल्या आहेत. टी-२०मध्ये राहुलने ४२ सामन्यात २ शतक आणि ११ अर्धशतकांसह १ हजार ४६१ धावा केल्या.

निलंबित केले होते

हार्दिक पंड्यासह एका कार्यक्रमात महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल बीसीसीआयने राहुलवर निलंबनाची कारवाई केली होती.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here