नवी दिल्ली: खेळ कोणताही असो प्रत्येक खेळाडू स्वत:च्या देशाला जिंकून देण्यासाठी प्रयत्न करत असतो. क्रिकेट सारख्या खेळात तर शेवटचा चेंडूपर्यंत सामना रंगतो. जेव्हा सामना भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील असतो तेव्हा त्याचे स्वरुप बदलते. दोन्ही संघातील खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करत असतात. आजच्या दिवशी म्हणजेच १८ एप्रिल १९८६ रोजी दोन्ही संघात एक ऐतिहासिक सामना झाला होता.

वाचा-
शारजाह मध्ये झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने भारताचा अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला होता. पाकिस्तानच्या जावेद मियादादने षटकार मारून सामना जिंकून दिला. आशिया कपची ही फायनल मॅच होती आणि भारताने प्रथम फलंदाजी करत ७ बाद २४५ धावा केल्या होत्या. भारताकडून के.श्रीकांत ७५, सुनील गावस्कर ९२ तर दिलीप वेंगसरकर यांनी ५० धावा केल्या होत्या.

वाचा-
विजयासाठी २४६ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानने ४९.५ षटकात २४२ धावा केल्या होत्या. पाकिस्तानची एक विकेट शिल्लक होती आणि त्यांना अखेरच्या चेंडूवर ४ धावांची गरज होती. सामन्यात चेतन शर्मा यांनी सर्वाधिक ३ विकेट घेतल्या होत्या आणि पण अंतिम चेंडूवर जावेद मियादादने षटकार मारून पाकिस्तानला विजय मिळवून दिला. मियादाद यांनी या सामन्यात नाबाद ११६ धावा केल्या.

वाचा-

आयसीसीने या मॅचमधील एक फोटो शेअर केला आहे. तर युझर्सनी त्याखाली अखेरच्या चेंडूवर षटकार मारलेला व्हिडिओ शेअर केला आहे.

वाचा-

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांची जेव्हा चर्चा होते तेव्हा या सामन्याचा उल्लेख होते. भारताचे गोलंदाज चेतन शर्मा यांनी २३ कसोटी आणि ६५ वनडे सामने खेळेल पण त्यांचे नाव या षटकाराशी जोडले जाते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here