आफ्रिदीने गेम चेंजर या त्याच्या आत्मचरित्रात गौतम गंभीरला सरासरी दर्जाचा खेळाडू म्हटले आहे. गंभीरच्या नावावर कोणताही मोठा विक्रम नाही. पण तो स्वत:ला डॉन ब्रॅडमन आमि जेम्स बॅन्ड समजतो. त्याचे वर्तनच एक मोठी समस्या आहे आणि त्याला व्यक्तीत्वच नाही. कोणताही मोठी विक्रम नसलेल्या या खेळाडूची नखरेबाजी जास्त असल्याचे आफ्रिदीने म्हटले आहे.
आफ्रिदीच्या या वक्तव्याचा समाचार घेताना गंभीर म्हणाला की, ” शाहिद तुला एक आठवण करून देतो. २००७ साली ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान आमने सामने आले होते. त्यावेळी मी ५४ चेंडूंत ७५ धावांची खेळी साकारली होती. तुला तर भोपळाही फोडता आला नव्हता. आमही विश्वचषक जिंकला होता, आम्ही विश्वविजेते होतो. संघासाठी मी नेहमीच प्रामाणिकपणे सहकार्य केले आहे. जर मला अॅटीट्युड असेल तर तो खोटं बोलणाऱ्या लोकांच्या विरोधात आहे. ज्या व्यक्तीला बरेच वर्षे आपले वय किती हेच माहिती नव्हते तो दुसऱ्यांचे विक्रम काय लक्षात ठेवणार.”
गेल्या काही दिवसात आफ्रिदीने भारताचे धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवाग आणि
यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. आता पुन्हा एकदा त्याने गंभीरबाबत वक्तव्य केले आहे. गंभीर हा सरासरी दर्जाचा खेळाडू असल्याचे आफ्रिदीने म्हटले आहे. या दोन्ही क्रिकेटपटूंचे संबंध पहिल्यापासून खराब आहेत. मैदानावर देखील या दोघांमध्ये अनेकदा वाद झाले आहेत. आता निवृत्तीनंतर सोशल मीडियावरून हे दोघे एकमेकांना सुनावतात.
आफ्रिदी आणि गंभीर यांच्यात २००७ साली एका वनडे सामन्यात वाद झाला होता. या वादाबद्दल आफ्रिदीने त्याच्या पुस्तकात लिहले आहे. त्यावेळी आमच्यात शिवीगाळ देखील झाली होती. त्याने पुस्तकातून विरेंद्र सेहवागवर देखील निशाना साधला आहे. सेहवाग सोशल मीडियावर नकारात्मक मत व्यक्त करत असतो.
वाचा-
आफ्रिदीने सचिन तेंडुलकर वगळता अन्य कोणत्याही भारतीय फलंदाजाबद्दल चांगले लिहले नाही. सचिन सर्वात मजबूत फलंदाज होता. १९९६ साली मी ३७ चेंडूत केलेले शतक सचिन तेंडुलकरने दिलेल्या बॅटने झळकावल्याचे आफ्रिदीने म्हटले आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times