नवी दिल्ली: कोणताही मोठा विक्रम नाही, फक्त नखरेबाजी जास्त, अशा शब्दात टीका करणाऱ्या पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने सडेतोड उत्तर दिले आहे. ज्याला स्वत:चे वय लक्षात नाही. तो माझे रेकॉर्ड काय लक्षात ठेवेल. आफ्रिदीने त्याच्या आत्मचरित्र गेम चेंजरमध्ये गंभीरवर जोरदार टीका केली होती.

वाचा-
गंभीरने आफ्रिदीने केलेल्या टीकेला सोशल मीडियावरून उत्तर दिले आहे. हे उत्तर देताना गंभीरने आफ्रिदीला टॅग केले. ज्या व्यक्तीला स्वत:चे वय लक्षात राहत नाही तो माझे विक्रम काय लक्षात ठेवेल. मी तुला एक आठवण करून देतो. २००७ च्या टी-२० वर्ल्ड कप फायनलमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात गंभीर ५४ चेंडूत ७५ धावा तर आफ्रिदी १ चेंडूत शून्य धाव. सर्वात महत्त्वाचे आम्ही वर्ल्ड कप जिंकला होता. माझ्यात अशा लोकांसाठी अहंकार आहे जे खोटारडे, कपटी आणि संधीसाधू असतात.

वाचा-

आफ्रिदीने गेम चेंजर या त्याच्या आत्मचरित्रात गौतम गंभीरला सरासरी दर्जाचा खेळाडू म्हटले होते. गंभीरच्या नावावर कोणताही मोठा विक्रम नाही. पण तो स्वत:ला डॉन ब्रॅडमन आमि जेम्स बॅन्ड समजतो. त्याचे वर्तनच एक मोठी समस्या आहे आणि त्याला व्यक्तीत्वच नाही. कोणताही मोठी विक्रम नसलेल्या या खेळाडूची नखरेबाजी जास्त असल्याचे आफ्रिदीने म्हटले होते.

वाचा-
आफ्रिदी आणि गंभीर यांच्यात २००७ साली एका वनडे सामन्यात वाद झाला होता. या वादाबद्दल आफ्रिदीने त्याच्या पुस्तकात लिहले आहे. त्यावेळी आमच्यात शिवीगाळ देखील झाली होती. त्याने पुस्तकातून विरेंद्र सेहवागवर देखील निशाना साधला आहे. सेहवाग सोशल मीडियावर नकारात्मक मत व्यक्त करत असतो.

वाचा-
या दोन्ही क्रिकेटपटूंचे संबंध पहिल्यापासून खराब आहेत. मैदानावर देखील या दोघांमध्ये अनेकदा वाद झाले आहेत. आता निवृत्तीनंतर सोशल मीडियावरून हे दोघे एकमेकांना सुनावतात.

हे देखील वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here