तबलिगी जमातबाबत वादग्रस्त पोस्ट करणारी भारताची महिला कुस्तीपटू बबीता फोगटविरोधात महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. बबीताच्या पोस्टमुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकते, त्यामुळे बबीताविरोधात औरंगाबाद शहर चौकातील पोलिस स्थानात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता बबीता या तक्रारीविरोधात नेमके काय पाऊल उचलते, याची उत्सुकता बऱ्याच जणांना आहे.

बबीताविरोधात तबलिगी जमातशी संबंधित एका व्यक्तीने तिच्याविरुद्ध औरंगाबाद येथे तक्रार दाखल केली आहे. बबीताच्या पोस्टमुळे समाजात तेढ निर्माण होत आहे आणि ते भारतासाठी योग्य नाही, असे तक्रारीमध्ये म्हटले गेले आहे. त्यामुळे आता बबीतापुढे समस्या वाढत असल्याचे दिसत आहे. आता या गोष्टीला बबीता कशी सामोरी जाते आणि या तक्रारीविरोधात बबीता काय भूमिका घेते, याची उत्सुकता आता देशवासियांना आहे.

बबीताने काय पोस्ट केली होतीअर्जुन पुरस्कार विजेत्या बबीताने, करोना व्हायरस भारताची दुसरी मोठी समस्या आहे. तर ‘तबलिगी जमात’ ही अद्याप नंबर एकवर आहे. तिच्या या ट्विटवरून अनेकांनी विरोध करण्यास सुरुवात केली.

बबीता आणि स्वरामध्ये ‘दंगल’बबीताविरुद्ध बोलताना स्वराने काही गोष्टी दाखवल्या आहे. स्वराने एक ट्विटकरून बबिताविरुद्ध एक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. स्वरा म्हणाली की, ” बबिताजी, आम्ही तुमचे चाहते आहोतच. पण ही आकडेवारी पाहा. या भक्तांची करोना चाचणी झाली होती का? कृपया या गोष्टीचाही विचार करायला हवा. त्याचबरोबर तबलिगी जमातच्या कार्यटक्रमासाठी दिल्ली पोलिसांनी परवानगी दिलीच कशी? हा प्रश्नदेखील तुम्ही उठवायला हवा.”

बबीताने केला पलटवारस्वराच्या या पोस्टला बबितानेही उत्तर दिले आहे. बबिता म्हणाली की, ” स्वरा, आपल्या देशाची लोकसंख्या ही १३५ कोटी एवढी आहे. करोनाच्या संकटापासून वाचण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. दिल्लीतून लाखो कामगार बिहार आणि उत्तर प्रदेशला रवाना झाले आहेत. पण करोना पसरवण्यासाठी ही मागास जमातच आघाडीवर का आहे? ”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here