सध्याच्या घडीला सर्वच खेळाडू आपल्या घरात आहेत आणि सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करत आहेत. जगभरात करोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे जवळपास सर्वच देशांत लॉकडाऊन आहे. जवळपास सर्वच स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलल्या गेल्या आहेत. पण खेळाडू मात्र विरंगुळा म्हणून सोशल मीडियावर आपल्या काही पोस्ट टाकत असतात. सध्याच्या घडीला भारताचा कर्णधार विराट कोहलीने आपला नवा लूक सर्वांसमोर आणला आहे, त्याचबरोबर त्याने एक चॅलेंजही दिले आहे.

कोहलीने ट्रीमरने स्वत:ची दाढी करत नवा लूक दिला आहे. हा नवा लूक कोहलीच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. कोहलीने आपण हा नवा लूक कसा केला, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये कोहली आपली दाढी करताना आणि नवीन लूक देताना दिसत आहे.

कोहलीने हा व्हिडीओ पोस्ट करताना एक मेसेजही लिहिला आहे. कोहलीने लिहिले आहे की, ” सध्याच्या घडीला आपण लॉकडाऊनमुळे घरातच आहोत, हेच आपल्यासाठी सुरक्षित आहे. पण घरात राहूनही काही चांगल्या गोष्टी आपल्याला करता येतात. आज मी घरातच राहून माझा नवीन लूक बनवला आहे. आता मी तुम्हाला ट्रीम अॅट होम, हे चॅलेंज देत आहे. यामध्ये तुम्ही घरच्या घरी स्वत:ची दाढी करून नवीन लूक द्यायचा आहे.”

सध्याच्या घडीला जगभरात कुठेही क्रिकेट स्पर्धा होताना दिसत नाही. त्यामुळे मॅच फिक्सिंग कशी होणार, असा सवाल बऱ्याच जणांना पडला असेल. सध्याच्या घडीला खेळाडू हे आपल्या घरी आहेत, त्याचबरोबर सोशल मीडियावर ते जास्त पोस्ट टाकत असल्याचेही दिसत आहे, अशावेळी बऱ्याच व्यक्ती खेळाडूंच्या संपर्कात येतात. खेळाडूंच्या संपर्कात आल्यावर विश्वास संपादन करतात आणि खेळाडूंकडून काही गोष्टी करून घेऊ शकतात. त्यामुळे सध्याच्या घडीला खेळाडूंनी सतर्क राहणे, सर्वात महत्वाचे आहे.

आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने प्रमुख अॅलेक्स मार्शल यांनी सांगितले की, ” सध्याच्या घडीला बऱ्याच देशांमध्ये लॉकडाऊन आहे, त्यामुळे क्रिकेट स्पर्धा होताना दिसत नाही. पण सध्या बरेच खेळाडू हे सोशल मीडियावर असतात. यावेळी त्यांच्या संपर्कात बऱ्याच व्यक्ती येतात. त्यामुळे काही लोकं या गोष्टीचा गैरफायदा घेऊ शकतात आणि त्याचा फटका खेळ व खेळाडूला बसू शकतो. त्यामुळे आम्ही सर्वच देशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here