सध्याच्या घडीला भारतामध्ये जोरदार चर्चा सुरु आहे ती माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या क्रिकेट भवितव्याची. धोनीचे भवितव्य हे आयपीएवर अवलंबून होते. पण आता करोना व्हायरसमुळे आयपीएल कधी खेळवली जाईल, हे कुणीही सांगू शकत नाही. त्यामुळे आता धोनीच्या कारकिर्दीचे काय होणार, यावर जोरदार चर्चा सुरु आहे. पण भारताच्या एका माजी निवड समिती अध्यक्षाने धोनीच्या भवितव्याबाबत एक वक्तव्य केले आहे. धोनीचे भवितव्य एका व्यक्तीच्या हातात असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

याबाबत भारताचे माजी क्रिकेटपटू आणि निवड समिती अध्यक्ष के. श्रीकांत म्हणाले की, ” धोनीने भारतासाठी बरेच काही केले आहे. पण क्रिकेटमध्ये काल खेळलेला चेंडू हा इतिहासामध्ये जमा होत असतो. त्यामुळे क्रिकेटमध्ये दरवेळी नवीन सुरुवात होत असते. धोनीकडे क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे, त्यामुळे ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात धोनीला संधी द्यायला हवी. धोनीला जर संधी दिली तर क्रिकेट जगताचे त्याच्यावर बारकाईने लक्ष असेल. मला तरी वाटते की, धोनीला विश्वचषकाच्या संघात स्थान द्यायला हवे. पण सध्याच्या घडीला निवड समिती अध्यक्ष सुनील जोशी आहेत. त्यामुळे धोनीने ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळायचे की नाही, हे आता सुनील जोशी ठरवतील.”

करोना व्हायरसमुळे क्रिकेट सामने स्थगित झाले असेल तरी मैदानाबाहेरची फटकेबाजी सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून आयपीएल, धोनीची निवृत्ती आदी विषयांवर विविध खेळाडू मत व्यक्त करत आहेत. करोनामुळे लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यामुळे आयपीएलचा १३वा हंगाम न होण्याची शक्यात आधिक आहे. यामुळेच धोनीचे भारतीय संघात परत येणे अवघड असल्याचे मानले जात आहे.

वाचा-
आयपीएल रद्द झाल्यास महेंद्र सिंह धोनीला भारतीय संघात घेणे अवघड होईल. त्याच बरोबर त्याला कोणत्या आधारावर संघात स्थान देणार असा सवाल भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने उपस्थित केला. धोनी आयपीएलच्या माध्यमातून क्रिकेट मैदानावर परतणार होता. पण चीनमधून जगभर पसरलेल्या करोना व्हायरसमुळे जगातील सर्वात श्रीमंत अशी क्रिकेट लीग स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. देशात करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आयपीएलच्या आयोजनावर शंकाच आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here