नवी दिल्ली: भारताच्या युवराज सिंगने २००७च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात एकाच षटकात सहा सिक्स मारण्याचा विक्रम केला होता. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका ओव्हरमध्ये युवराजने सहा चेंडूवर सहा षटकार मारले होते. टी-२० वर्ल्ड कपमध्ये युवराजने केलेल्या या विक्रमाची नोंद क्रिकेटच्या इतिहासात झाली आहे. या विक्रमाबद्दल युवराजने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

वाचा-
युवराजने सांगितले की, एकाच ओव्हरमध्ये सहा षटकार मारल्यानंतर माझ्या बॅटबद्दल अनेकांनी शंका व्यक्त केल्या. मी केलेल्या विक्रमाबद्दल अनेकांना विश्वास बसत नव्हता. इतक नव्हे तर ऑस्ट्रेलियाचा माजी विकेटकीपर अॅडम गिलख्रिस्टने सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३० चेंडूत केलेल्या ७० धावांबद्दल शंका व्यक्त केली होती.

वाचा-
तेव्हा ऑस्ट्रेलियाचे कोच माझ्याजवळ आले आणि मला विचारले की तुझ्या बॅटमध्ये काही खास लाकूड वापरले आहे का? आणि याचा वापर करण्याची परवानगी आहे का? मॅच रेफरींनी ही बॅट पाहिली आहे का? यावर मी त्यांना माझ्या बॅटीची तपासणी करण्यास सांगितली. गिलख्रिस्टने तर तुझी बॅट कोण तयार करते असा प्रश्न विचारला होता.

इंग्लंडविरुद्ध ६ षटकार मारल्यानंतर मॅच रेफरींनी माझी बॅट तपासली होती. पण मी सांगू इच्छितो की, ती बॅट माझ्यासाठी अतिशय खास होती. त्या सामन्याआधी मी कधीच ती बॅट वापरली नव्हती. २००७ आणि २०११च्या वर्ल्ड कपमधील बॅट माझ्यासाठी खास आहेत, असे युवराजने सांगितले.

वाचा-

युवराज सिंगला दिली होती गळा कापण्याची धमकी
भारतीय संघ २००७ साली दक्षिण आफ्रिकेत पहिला ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळायला गेला होता. या विश्वचषकात भारताचा सामना इंग्लंडबरोबर होता. या सामन्यात युवराजने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला सलग सहा षटकार खेचले होते, हा प्रसंग कोणीही विसरू शकत नाही. पण या सामन्यात युवराजला चक्क गळा कापण्याची धमकी एका खेळाडूने दिली होती.

… तर घडले असे की, युवराज आणि महेंद्रसिंग धोनी हे दोघे त्यावेळी फलंदाजी करत होते. अँड्र्यू फ्टिंटॉफ त्यावेळी गोलंदाजी करत होता. युवराजने त्याच्या षटकार खणखणीत दोन चौकार लगावले. हे षटक संपल्यावर युवराज धोनीबरोबर बातचीत करण्यासाठी चालत पुढे गेला होता. त्यावेळी फ्टिंटॉफ युवराजसमोर आला. त्यावेळी त्याने युवराजला काही अपशब्दही वापरले. कारण त्याच्या चांगल्या चेंडूंवर युवराजने चौकार लगावले होते. त्यामुळे त्याने युवराजला रागात म्हटले की, ” तु बाहेर आलास ना तर तुझा गळा कापेन.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here