मुंबई: करोना व्हायरसच्या धोक्यामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. भारतात देखील बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहे. आता असाच धोका आणखी एका मोठ्या क्रीडा स्पर्धेच्या आयोजनावर झाला आहे.

वाचा-
येत्या काही महिन्यात करोनावर नियंत्रण मिळवले जाईल आणि त्यानंतर क्रीडा स्पर्धाचे आयोजन करता येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ऑस्ट्रेलियात करोना व्हायरसमुळे सहा महिने म्हणजेच ३० सप्टेंबरपर्यंत सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या काळात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपच्या आयोजनावर शंका व्यक्त केली जात आहे.

यासंदर्भात स्पर्धेशी संबंधित एका विश्वसनिय सूत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलल्या माहितीनुसार, संदर्भात ऑगस्टच्या आधी कोणताही निर्णय घेणार नाही.

वाचा-
सध्या परिस्थिती चांगली नाही. आरोग्य हे महत्त्वाचे आहे. जर पुढील दोन महिन्यात परिस्थितीत सुधारणा झाली आणि त्याआधी आयसीसीने मे महिन्यातच वर्ल्ड कप स्थगित करण्याचा निर्णय घेतला तर? त्यामुळेच आयसीसी कोणताही निर्णय घाईत करणार नाही. टी-२० वर्ल्ड कप बाबतचा निर्णय विचार करून घेतला जाईल. त्यामुळेच ऑगस्टच्या आधी याबाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.

सध्या तरी वर्ल्ड कप संदर्भात जे ठरले आहे. त्यानुसार गोष्टी सुरू आहेत. या घडीला स्पर्धा नियोजित वेळेनुसार होतील असे मानले जात आहे. गेल्या काही दिवसात टी-२० स्पर्धा रिकाम्या मैदानात खेळवल्या जाणार असल्याची चर्चा होती.

याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉगने टी-२० वर्ल्ड कपच्या आयोजनासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करावेत. यासाठी खेळाडूंना एक महिना आधीच चार्टर्ड विमानाने आणावे आणि सर्वांची करोना चाचणी घ्यावी, असे म्हटले होते.

अनेक खेळाडू लॉकडाऊनमुळे घरीच आहेत. त्यामुळे त्यांना टी-२० वर्ल्ड कपची तयारी आणि सरावासाठी वेळ नाही मिळाला. यासाठी त्यांना एक महिना आधीच ऑस्ट्रेलियात आणावे लागले, असा हॉग विचार आहे.

सध्या विमान सेवा बंद आहे. अशा परिस्थितीत खेळाडूंना चार्टर्ड विमानाने आणावे. त्याआधी त्यांची करोना टेस्ट घेतली जावी. ऑस्ट्रेलिया आल्यानंतर देखील दोन आठवडे सर्वांना लॉकडाऊनमध्ये ठेवले जावे. त्यानंतर पुन्हा एकदा करोना चाचणी घेऊन ती नेगेटिव्ह आल्यावर सराव सुरू केला जावा, असे हॉगचे म्हणणे आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here