पालघरमधील मॉब लिंचिंगच्या या घटनेमुळे देशात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवर आता विविध स्तरातून प्रतिक्रीया यायला सुरुवात झाली आहे. भारताचा ऑलिम्पिक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्तनेही यावेळी या प्रकरणर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या महाराष्ट्रात संतांची हत्या होते, ही कल्पनाही करवत नाही, अशी टीका योगेश्वरने केली आहे.

योगेश्वरला या प्रकरणाचा एक व्हिडीओ मिळाला आहे. हा व्हिडीओ भयंकर गोष्टी दाखवत असल्याचे दिसत आहे. काही लोकं मिळून एका वृद्ध व्यक्तीवर हल्ला करत असल्याचे यामध्ये दिसत आहे. हे ७० वर्षीय चिकने महाराज कल्पवृक्षगिरी असल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्याबरोबर सुशीलगिरी महाराज आणि चालक निलेश तेलगडे होते. या तिघांना या जमावाने मारहाण केली आणि या तिघांचा जागीच मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे.

हा व्हिडीओ पोस्ट करताना योगेश्वर म्हणाला की, ” महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यामध्ये पोलिसांच्या डोळ्यादेखलत दोन संतांची हत्या करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्रात संताची हत्या घडली, ही कल्पनाही करवत नाही.”

पालघर येथे शुक्रवारी मध्यरात्री नाशिककडे जात असताना सुमारे शंभर जणांच्या जमावांनी चोर समजून दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकावर हल्ला केला होता. या हल्ल्यात या तिघांचाही मृत्यू झाला. मॉब लिंचिंगच्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून त्यावरून राजकारणही रंगले आहे.

पालघर येथील मॉब लिंचिंगची घटनेबाबत बबीताने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये बबीताने म्हटले आहे की, ” महाराष्ट्रातील पालघर येथे पोलिसांसमोर तीन संतांची हत्या करण्यात आली. ठाकरे सरकार झोपा काढतंय का? त्यांना लाज वाटली पाहिले. सर्व दोषी कॅमेरामध्ये स्पष्टपणे दिसत आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई केली गेली पाहिजे.”

पालघरच्या प्रकरणाचा निषेध गौतम गंभीरने केला आहे. या प्रकरणाबाबत गंभीरने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये गंभीरेने लिहीले आहे की, ” सध्याच्या घडीला माणसामध्ये प्राणी पाहायला मिळत आहे. माणसाची कातडी वावरून प्राणी वावरत असल्याचे दिसत आहे. पालघर येथे अमानुष प्रकार घडला. हा प्रकार निंदनीय होता. पालघर येथील लोकांनी तीन जणांचा जीव घेतला आणि त्यांनी ७० वर्षांच्या व्यक्तीची विनवणीही ऐकली नाही, अशा लोकांची मला लाज वाटते.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here