करोना व्हायरसचा फटका जगभराला बसला आहे. त्यामुळे जगभरात सध्याच्या घडीला चिंतेचे वातावरण आहे. करोना व्हायरसमुळे सध्याच्या घडीला एकही क्रीडा स्पर्धा होताना दिसत नाही. काही स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत तर काही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता तर करोना व्हायरसमुळे क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल बदल होणार, असे संकेत मिळत आहेत. या गोष्टीवर आता आंतरराष्ट्री क्रिकेच परिषद (आयसीसी) निर्णय घेणार असल्याचेही समजत आहे.

यापूर्वी क्रिकेटमध्ये काही गोष्टी सहजपणे व्हायच्या. त्या गोष्टींना कोणाचाही आक्षेप नसायचा. पण आता मात्र करोना व्हायरसनंतर काही गोष्टींना क्रिकेटपटू किंवा चाहते आक्षेत घेऊ शकतात. त्यामुळेच आयसीसीने काही नियम बनवण्याचे ठरवले आहे.

क्रिकेटपटू हे जास्तकरून मैदानात चेंडूला चकाकी देण्याता प्रयत्न करत असतात. गोलंदाजाला मदत म्हणून क्षेत्ररक्षक ही गोष्ट करत असतात. पण करोना व्हायरसनंतर क्रिकेट खेळताना जर कोणी लाळ लावून चेंडूला चकाकी देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर आक्षेप घेतला जाऊ शकतो. त्यामुळे आता नेमके काय करायचे, याचा विचार आयसीसी करत आहे.

काय असेल उपायचेंडूला चकाकी आणण्यासाठी खेळाडूंना लाळेचा वापर करावाच लागतो. पण करोना व्हायरसनंतर संघातील एकाच खेळाडूला चेंडूला चकाकी देण्याचे काम सोपवण्यात येऊ शकते. जर असे घडले तर त्याला जास्त लोकं आक्षेप घेणार नाहीत, असे दिसत आहे.

करोना व्हायरसमुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. एकाबाजूला करोना व्हायरसशी लढाई सुरु असताना दुसऱ्या बाजूला काही क्रिकेट मंडळांवर आर्थिक संकट ओढावल्याचे पाहायला मिळत आहे. कारण सध्याच्या घडीला करोना व्हायरसमुळे कोणतीही क्रिकट स्पर्धा सुरु नाही. त्यामुळे खेळाडू घरी बसून आहेत. त्याचबरोबर कोणतेही सामने होत नसल्यामुळे क्रिकेट मंडळांचे आर्थिक व्यवहार ठप्प झालेले आहेत. त्यामुळे या क्रिकेट मंडळांची आर्थिक समीकरणे बिघडली आहेत. त्यामध्येच आयसीसीने एकाही देशाला आर्थिक मदत केलेली नाही. त्यामुळे सध्या करायचे तरी काय, हा प्रश्न बऱ्याच क्रिकेट मंडळांना पडलेला आहे. आता यावर उपाय काय शोधता येईल, याचा विचार बऱ्याच देशांमध्ये सुरु झाला आहे. पण सध्याच्या घडीला तरी या समस्येमधून कोणताही मार्ग निघताना दिसत नाही.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here