सध्याच्या घडीला करोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. त्यामुळे करोना व्हायरसशी लढण्यासाठी औषध बनवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. पण जर करोना व्हायरसचे औषध बनवले गेले तर ते सर्वांना अनिवार्य करू नका, असे धक्कादायक वक्तव्य एका महान खेळाडूने केले आहे.

करोना व्हायरसपुढे सध्याच्या घडीला जवळपास सर्वच देश हतबल झाल्याचे दिसत आहे. कारण करोना व्हायरस हा आटोक्यात येताना दिसत नाही. करोना व्हायरसची लस किंवा औषध कधी येणार आणि योग्य उपचार कधी सुरु होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. त्यामध्येच एका दिग्गज खेळाडूने करोना व्हायरसचे औषध सर्वांनाच देऊ नका, असे मत त्याने मांडले आहे.

काही दिवसांपूर्वी टेनिस विश्वातील माजी नंबर वन खेळाडू अमेली मोऊरेस्मोने एक विधान केले होते. त्यावेळी अमेली म्हणाली होती की, करोना व्हायरसचे औषध हे सर्व खेळाडूंसाठी अनिवार्य असायला हवे.

टेनिसमधील सध्याच्या अव्वल खेळाडू नोव्हाक जोकोव्हिचने मात्र या गोष्टीला कडाडून विरोध केला आहे. जोकोव्हिच म्हणाला की, ” करोना व्हायरसचे औषध सर्वांसाठी अनिवार्य केले तर काय होईल? मला याबाबत एक निर्णय घ्यावा लागेल. माझा याबाबत एक निर्णय झालेला आहे आणि हा निर्णय बदलेले की नाही, हे मला सध्याच्या घडीला माहिती नाही.”

जोकोव्हिच पुढे म्हणाला की, ” समजा जर टेनिसच्या मोसमाला जुलैपासून सुरुवात करण्यात आली, तर सर्व खेळाडूंना करोना व्हायरसचे औषध घेणे बंधनकारक असेल. पण आतापर्यंत करोना व्हायरसचे औषध सापडलेले नाही. त्याचबरोबर ते सापडल्यावर त्याचे काही प्रयोग केले जातील, हे प्रयोग कितपत यशस्वी होतील आणि करोना व्हायरसचे रुग्ण किती बरे होतील, हे पहिल्यांदा पाहायला हवे. त्यानंतर करोना व्हायरसचे औषध खेळाडूंना द्यायला हवे. त्याचबरोबर या औषधामध्ये नेमके काय आहे, हेदेखील पहिल्यांदा तपासून पाहायला हवे. त्यामुळे सध्याच्या घडीला करोना व्हायरसचे औषध सर्व खेळाडूंना देणे हे योग्य नसल्याचे मला तरी वाटते.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here