करोना व्हायरसचा मोठा फटका क्रीडा जगतालाही बसला आहे. कारण करोना व्हायरसमुळे सध्याच्या घडीला एकही स्पर्धा खेळवली जात नाहीए. पण आशियातील एका देशाने चक्क क्रीडा स्पर्धा भरवण्याचे ठरवले आहे. पुढील आठवड्यापासून या मध्य आशियातील देशामध्ये स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.
सध्याच्या घडीला क्रीडा विश्व करोना व्हायरसमुळे हैराण आहे. पण मध्य आशियातील तुर्कमेनिस्तानमध्ये एकही करोना व्हायरसचा रुग्ण आतापर्यंत सापडलेला नाही. त्यामुळे त्यांनी यंदाच्या रविवारपासून फुटबॉलचा मोसम सुरु करण्यासाठी पावले उचलली आहेत. यापूर्वी करोना व्हायरसमुळे तुर्कमेनिस्तानने आपली फुटबॉल लीग स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी तुर्कमेनिस्तानमध्ये फुटबॉल लीगचे फक्त तीन सामने खेळवले गेले होते. त्यानंतर तुर्कमेनिस्तानने करोना व्हायरसमुळे ही लीग स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. पण आता यंदाच्या रविवारपासून ही लीग पुन्हा एकदा सुरु करण्यात येणार आहे. तुर्कमेनिस्तानच्या राष्ट्रीय फुटबॉल महासंघाने आरोग्य मंत्रालय आणि विश्व आरोग्य संघटनेकडे याबाबत शिफारस केली होती आणि त्यानंतरच ही फुटबॉल लीग यंदाच्या रविवारपासून सुरु करण्यात येणार आहे.
चीनमध्ये फेब्रुवारी महिन्यात चीन सुपर लीग ही फुटबॉल स्पर्धा होणार होती, पण करोना व्हायरसमुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. पण आता ही स्पर्धा जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्यापासून सुरु करण्यात येणार असल्याचे समजते आहे. फुटबॉल क्लब गुआंग्झू आर अँड एफचे अध्यक्ष हुआंग शेंगहुआ यांनी ही माहिती दिली आहे.
चीन सुपर लीगवर सर्वांच्या नजराचीन सुपर लीग ही काही दिवसांमध्ये सुरु होणार आहे. चीनमध्ये फेब्रुवारी महिन्यात चीन सुपर लीग ही फुटबॉल स्पर्धा होणार होती, पण करोना व्हायरसमुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. आता ही स्पर्धा झाल्यावर ती कशी खेळवण्यात येते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. कारण ही स्पर्धा खेळवताना चीनमध्ये कोणती सुरक्षेची काळजी घेतली जाते आणि स्पर्धा कशी यशस्वी केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times