तबलीगी जमातच्या पोस्टवरून बबीता ही चांगलीच ट्रोल झाली आहे, त्याचबरोबर बऱ्याच जणांनी बबीतावर जोरदार टीकाही केली आहे. यापूर्वी बॉलीवूडची स्टार स्वरा भास्कर आणि बॅडमिंटनपटू ज्वागा गट्टा यांनी बबीतावर जोरदार टीका केली होती, आता तर बॉलीवूडच्या राखी सावंतनेही बबीताला सोडलेले नाही.
बबीतावर टीका करताना राखी म्हणाली की, ” बबीता फोगट ही भारताची कुस्तीपटू आहे, ती असं वक्तव्य कसं काय करू शकते. तू भारतीय देशासाठी खेळतेस. त्यामुळे देशाचे प्रतिनिधीत्न करताना कोणतीही जात किंवा धर्म कधीही आडवा येत नाही. भारतामध्ये सर्व धर्म समान आहेत. भारतामध्ये सर्व धर्मांमध्ये चांगला सलोखा आहे, त्यामुळे या परिस्थितीमध्ये अशी वक्तव्य करून समाजाला भडकवण्याचा प्रकार करू नकोस. देशातला प्रत्येक मुसलमान हा भारतावर प्रेम करतो. तो या देशाचा नागरिक आहे. त्यामुळे फक्त काही लोकांमुळे संपूर्ण मुस्लिम समाजाला दोषी ठरवणं, चुकीचं आहे. बबीता तुझं आडनाव फोगट आहे, त्यामुळे फुकटचे सल्ले देत बसू नकोस. तू संपूर्ण देशांची आणि मुस्लिमांची माफी मागायली हवी.”
बबीताविरुद्ध महाराष्ट्रात तक्रारतबलिगी जमातबाबत वादग्रस्त पोस्ट करणारी भारताची महिला कुस्तीपटू बबीता फोगटविरोधात महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. बबीताच्या पोस्टमुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकते, त्यामुळे बबीताविरोधात औरंगाबाद शहर चौकातील पोलिस स्थानात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता बबीता या तक्रारीविरोधात नेमके काय पाऊल उचलते, याची उत्सुकता बऱ्याच जणांना आहे.
बबीताविरोधात तबलिगी जमातशी संबंधित एका व्यक्तीने तिच्याविरुद्ध औरंगाबाद येथे तक्रार दाखल केली आहे. बबीताच्या पोस्टमुळे समाजात तेढ निर्माण होत आहे आणि ते भारतासाठी योग्य नाही, असे तक्रारीमध्ये म्हटले गेले आहे. त्यामुळे आता बबीतापुढे समस्या वाढत असल्याचे दिसत आहे. आता या गोष्टीला बबीता कशी सामोरी जाते आणि या तक्रारीविरोधात बबीता काय भूमिका घेते, याची उत्सुकता आता देशवासियांना आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times