नवी दिल्ली: डब्ल्यूडब्ल्यूई ()मधील भारताचा सर्वांना माहित आहे. करोना लॉकडाऊनमध्ये अन्य क्रीडा स्पर्धे प्रमाणे डब्ल्यूडब्ल्यूई देखील बंद आहे. अशा वेळी खली घरात थांबून कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. रिकाम्यावेळात खलीने क्रिकेटची बॅट हातात घेतली आहे. खलीचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये खली क्रिकेट शॉट खेळत आहे. खलीच्या हातातील क्रिकेट बॅट लहान मुलांच्या खेळण्यातील बॅट प्रमाणे वाटत आहे. विशेष म्हणजे खलीने क्रिकेट खेळताना धोती घातली आहे.

वाचा-
खलीचा जन्म २७ ऑगस्ट १९७२ रोजी झाला. डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये खलीने अनेकांचा पराभव केला आहे. ते दिवसभरात ३० ते ४० अंडे, दोन किलो चिकन, डाळ, भात खातो. डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये भाग घेण्याबरोबर खलीने काही चित्रपटात काम केले आहे. बिग बॉस या रियालिटी शो मध्ये त्याने भाग घेतला होता.

डब्ल्यूडब्ल्यूईच्या रिंगमध्ये अंतिम सामन्यात खलीने द अंडरटेकरचा पराभव केला होता. केवळ ९ मिनिटात खलीने अंटरटेकराचा पराभव करत सर्वांना धक्का दिला होता.

वाचा-

सध्या देशात करोना व्हायरसच्या धोक्यामुळे ३ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. देशात करोना रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत चालली आहे. आतापर्यंत देशात १८ हजार ९८५ रुग्ण आढळले असून गेल्या २४ तासात १ हजार ३२९ नवे रुग्ण आढळले आहेत. देशात करोना मृत्यूची संख्या ६०३ वर पोहोचली आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here