नवी दिल्ली: करोना व्हायरसमुळे चीनमधील परिस्थिती आता कुठे नियंत्रणात आली आहे. पण जगभरात या व्हायरसने लोकांचे आयुष्य थांबवले आहे. अशात चीनने सर्व जगाचे लक्ष वेधले असून यासाठी करोना हे कारण नाही. चीन जगातील सर्वात मोठे फुटबॉलचे स्टेडियमची निर्मिती करत आहे. यासाठी १३ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर स्टेडियमची प्रेक्षकांची क्षमता १ लाख इतकी असेल. सध्या बार्सिलोनाचे कॅम्प नाऊ हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम असून त्याची क्षमता ९९ हजार ३५४ इतकी आहे.

वाचा-
चीनमधील येथे एवरग्रांड या रियल स्टेट ग्रुपकडून या मैदानाची निर्मिती केली जात आहे. हे स्टेडियम २०२२ पर्यंत बांधून पूर्ण होईल. गेल्या गुरुवारी या मैदानाचे बांधकाम सुरू झाले. हे मैदान ग्वांगजू एवरग्रांड फुटबॉल क्लबचे होम ग्राऊड देखील असले. आम्ही अशा एका स्टेडियमची निर्मिती करत आहोत, ज्याची तुलना सिडनीच्या ओपेरा हाऊस आणि दुबईच्या बुर्ज खलीफा या वास्तूंशी केली जाईल. हे स्टेडियम चीनी फुटबॉलची नवी ओळख असेल असे कंपनीचे अध्यक्ष शिया हुजैन यांनी सांगितले. २०२३च्या आशिया कपच्या उद्घाटन कार्यक्रम या मैदानावर होईल अशी अशा आहे.

वाचा-
जगातील सर्वात मोठे मैदानाचा आकार कमळासारखा आहे. ग्वांगझूला फुलांचे शहर म्हटले जाते. म्हणूनच या स्टेडियमचा आकार कमळासारखा ठेवण्यात आला आहे. याचे डिझाईन अमेरिकेतील प्रसिद्ध डिझायनर हसन सईद यांनी केले आहे. या मैदानाची निर्मिती ३ लाख स्क्वेअर मीटर परिसरात केली जात आहे. यात एकूण १६ व्हीव्हीआयपी रुम, १५२ खासगी रुम, फिफा सदस्यांसाठी आणि खेळाडूंसाठी स्वतंत्र विभाग आणि मीडिया रुम असतील.

वाचा-

ईएसपीएनने दिलेल्या वृत्तानुसार एरवग्रांड ग्रुप चीनमध्ये अशी आणखी ३ स्टेडियम तयार करण्याचा विचार करत आहे. याची प्रेक्षक क्षमता ८० हजार ते १ लाख इतकी असेल. अशा स्टेडियमच्या जोरावर चीन भविष्यात फुटबॉल वर्ल्ड कपच्या आयोजनाचा दावा करणार आहे. या वर्षी चीनमध्ये फिफा क्लब वर्ल्ड कप होणार होता. पण करोना व्हायरसमुळे ही स्पर्धा एक वर्षासाठी स्थगित केली.

वाचा-
ग्वांगझू एवरग्रांड हा चीन आणि आशियातील सर्वात यशस्वी फुटबॉल क्लब आहे. या संघाने ८ वेळा चायनीझ सुपर लीग आणि दोन वेळा आशियाई चॅम्पियन लीग स्पर्धा जिंकली आहे. या वर्षी हाच संघ विजेतेपदाचा दावेदार मानला जात होता. ही स्पर्धा यावर्षी २२ फेब्रुवारीपासून सुरू होणार होती. पण कोरनामुळे स्पर्धाच रद्द केली.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here