सध्याच्या घडीला जगभरात करोना व्हायरसमुळे चिंतेचे वातावरण आहे. करोना व्हायरसशी लढण्यासाठी सर्वच प्रयत्न करत आहेत, पण काही लोकं करोना व्हायरसबाबत चुकीची माहिती पसरवत आहेत. करोना व्हायरसविषयी चुकीची माहिती पसरवणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्यात यायला हवी, असे म्हटले जात आहे. पण एका दिग्गज खेळाडूच्या बायकोने करोना व्हायरसबाबत चुकीची माहिती पसरवल्याचे पुढे आले आहे. आता तिच्यावर नेमकी काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

नेमके घडले तरी काय…टेनिस विश्वातील दिग्गज खेळाडू नोव्हाक जोकोव्हिचला आपण सारेच जाणतो. नोव्हाकची बायको जेलेनाने करोना व्हायरसशी संबंधित एक चुकीचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला. यामध्ये करोना व्हायरस आणि ५जी नेटवर्क यांचा संबंध असल्याचे तिने म्हटले होते. जेलेनाचे पाल लाख फॉलोअर्स आहेत, त्याचबरोबर काही खेळाडूंनीही हा व्हिडीओ शएअर केला होता. त्यामुळे हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर आता तिला हा व्हिडीओ चुकीचा असल्याचे समजले.

व्हिडीओमध्ये काय म्हटले होते…करोना व्हायरससाठी काय कारणीभूत आहे, हे सांगणारे बरेच व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. पण करोना व्हायरसबाबत खात्रीलायक माहिती कुठेच मिळत नाही. तुम्हाला करोना व्हायरसबाबत नेमके काय वाटते, तुम्ही हा व्हिडीओ पाहा आणि मला कळवा…, असे जेलेनाने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटले होते. काही दिवसांपूर्वी तर जेलेनाने एक अजब वक्तव्य केले होते. आफ्रिकेमध्ये ५जी नेटवर्क नाही, त्यामुळे तिथे करोना व्हायरसचा प्रसार झालेला पाहायला मिळत नाही. हे व्हिडीओ फॅक्ट चेकर्सने डिलीट केले आहेत. पण आता जेलेनावर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. कारण करोना बाबत कोणीही अफवा पसरवू नये, असे म्हटले गेले आहे आणि त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेशही दिले गेले आहेत. पण ही व्यक्ती श्रीमंत कुटुंबातील असल्यामुळे तिच्यावर कारवाई होणार की नाही, याची उत्सुकता जगभरातील लोकांना आहे. आता जेलेनावर नेमकी काय कारवाई केली जाते किंवा केली जात नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here