मुंबई: भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले आहे. येत्या २४ एप्रिल रोजी सचिन ४७वा वाढदिवस आहे.

वाचा-
सचिनच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जगभरात आणि देशात करोना व्हायरसमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे निर्णय घेतला आहे. दर वर्षी सचिनचा वाढदिवस () मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. त्याच्या वाढदिवसाला क्रिकेटसह अन्य क्षेत्रातील दिग्गज लोक उपस्थित असतात. पण यावर्षी परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळेच सचिनने वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले आहे.

वाचा-
सचिन क्रिकेटमधून निवृत्त होण्याआधी देखील जेथे असायचा तेथे त्याचा वाढदिवस साजरा केला जात असे. पण यावेळी लॉकडाऊनमुळे संपूर्ण देश घरीच थांबला आहे. सचिन कुटुंबियांसोबत घरी आहे. गेल्या काही दिवसात सचिनने करोना व्हायरस संदर्भात अनेक व्हिडिओ आणि फोटो शेअर करून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सचिन सातत्याने लोकांना सोशल डिस्टेसिंग ठेवण्यास सांगत आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने केलेल्या मार्स्क फोर्सच्या व्हिडिओत सचिन दिसला होता.

वाचा-
करोना विरुद्धच्या लढाईत सचिनने ५० लाख रुपयांची आर्थिक मदत केली होती. यातील २५ लाख केंद्र तर २५ लाख राज्य सरकारला दिले होते. त्याशिवाय काही हजार गरीब लोकांच्या एका महिन्याचा खर्च सचिनने दिला होता.

हे देखील वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here