नेमके घडले तरी कायसध्याच्या घडीला देशभरात लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्वच स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. खेळाडू सरावही करताना दिसत नाहीत. पण या परिस्थितीत भारतातील एका सात वर्षांच्या मुलीने सराव सुरु केला आहे. सराव करत असताना तिची फलंदाजी पाहून चाहत हैराण झालेले पाहायला मिळत आहेत.
सात वर्षांच्या या चिमुरडीचे नाव आहे परी शर्मा. परी आपल्या घरात फलंदाजीचा सराव करत आहे. तिचा हा फलंदाजीचा सराव पाहून इंग्लंडचे माजी कर्णधार माईक आर्थरटन तिच्या प्रेमात पडले आहेत. त्यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. परीची फलंदाजी पाहून शब्दच आठवत नाहीत, असे कौतुक त्यांनी केले आहे.
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनही परीच्या फलंदाजीच्या प्रेमात पडला आहे. वॉन म्हणाला की, ” हा व्हिडीओ तुम्ही पाहिलात का. या व्हिडीओमध्ये फक्त सात वर्षांची परी शर्मा फलंदाजी करत आहे. एवढ्या लहान वयात एवढी चांगली फलंदाजी पाहिलेली नाही. फलंदाजी करत असताना परीच्या हालचाली या नेत्रदीपक अशाच आहेत.”
सात वर्षांच्या परीचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरस झाला आहे. या व्हिडीओमध्ये परी कव्हर ड्राइव्ह, ऑफ ड्राइव्ह आणि पुल शॉट मारताना दिसत आहे. सात वर्षांच्या मुलीमध्ये अवढी गुणवत्ता कुठून आली, याचा विचार सध्या चाहते करताना दिसत आहेत. क्रिकेट विश्वामध्ये हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. भारताबरोबरच इंग्लंड, वेस्ट इंडिजसारख्या देशांमध्ये मोठ्या संख्येने लोकं हा व्हिडीओ पाहताना दिसत आहेत. आता ही परी भारतीय संघात कधी दिसणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागलेली आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times