वाचा-
फक्त भारताचा नाही तर जागतिक क्रिकेटमधील अव्वल फलंदाज अशी विराटची ओळख आहे. भारताकडून ८६ कसोटीत ७ हजार २४०, २४८ वनडेतून ११ हजार ८६७ आणि ८२ टी-२० सामन्यातून २ हजार ७९४ धावा करणाऱ्या विराटने २००८ मध्ये १९ वर्षाखालील वर्ल्ड कपचे विजेतेपद मिळवून दिले होते.
मला पहिल्यांदा राज्य संघातून वगळण्यात आले होते. तेव्हा मी रात्रभर झोपलो नाही आणि जवळ जवळ ३ वाजेपर्यंत रडत होतो. विश्वास बसत नव्हता की मला संघात घेतले नाही. कोहलीने २००६ मध्ये दिल्ली संघातून पदार्पण केले. त्यानंतर २ वर्षांनी विराटला भारतीय संघात स्थान मिळाले. विराटने श्रीलंकेविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
वाचा-
तेव्हा मी सर्व सामन्यात चांगली फलंदाजी करत धावा केल्या होत्या. सर्व काही चांगले झाले होते. लोक माझ्या कामगिरीवर खुश होते. मी सर्व स्तरावर चांगला खेळ केला होता. तरी मला संघात घेतले नव्हते. या संदर्भात मी माझ्या प्रशिक्षकांसोबत दोन तास बोललो होतो. आतापर्यंत मला त्याबद्दल काही समजू शकले नाही. माझ्या मते जेथे धैर्य आणि प्रयत्न असतात तेथे यश मिळते, असे विराट म्हणाला.
करोना व्हायरस संदर्भात बोलताना विराट म्हणाला, याची एक सकारात्मक बाजू देखील आहे. आपण सर्व समाज म्हणून अधिक उदार झालो आहोत. पोलिस, डॉक्टर अथवा नर्स करोना विरुद्ध लढत आहेत, त्याचे आभार. हे संकट गेल्यानंतर ही भावना कायम रहावी. आयुष्याबद्दल काही सांगता येत नाही. ज्या गोष्टींपासून आनंद मिळतो ती करा. प्रत्येक वेळी तुलना करू नये. या संकटातून बाहेर पडल्यानंतर आयुष्यात बरेच बदल झाले असतील असे विराटने सांगितले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times