काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारताकडे मदत मागितली होती. पाकिस्तानला १० हजार व्हेंटिलेटरची गरज आहे. यासाठी भारताने आम्हाला मदत करावी, अशी विनंती शोएबने केली होती. आता तर पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटात सापडला असल्याचे दिसत आहे.
पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि पंतप्रधान इम्रान खान यांचे निकटवर्तीय वकार युनिसने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने पाकिस्तान आर्थिक संकटात असून आम्हाला मदत करावी, असे त्याने म्हटले आहे.
वकार म्हणाला की, ” सध्याच्या घडीला पाकिस्तान हा वाईट परिस्थितीमधून जात आहे. करोना व्हायरसमुळे तर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशवासियांसहीत देशाबाहेरील व्यक्तींकडून मदत मागितली आहे. त्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे सर्वांनी या घडीला पाकिस्तानला मदत करावी, असे मीदेखील आवाहन करतो.”
यापूर्वीच पाकिस्तान कर्जात बुडालेलावकारने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसल्याचे एकाबाजूला सांगितले आहे. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान हा यापूर्वीच कर्जात बुडालेला आहे, असे म्हटले आहे. वकार म्हणाला की, ” सध्याच्या घडीला पाकिस्ताडन आर्थिक संकटामध्ये आहे. पण पाकिस्तान यापूर्वीच कर्जामध्ये बुडालेला होता. या सर्वामधून आम्हाला वर यायचे आहे. इम्रान खान हे पाकिस्तानची स्थिती चांगली करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.”
इम्रान खान संबोधन करणारयेत्या २-३ दिवसांमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे देशाला संबोधन करणार आहे. यामध्ये सध्याच्या घडीला देशामध्ये काय वातावरण आहे. देशाची आर्थिक परिस्थिती काय आहे, हे ते सांगतील, असे म्हटले जात आहे. त्याचबरोबर इम्रान यावेळी मदतीचे आवाहन करणार असल्याचेही म्हटले जात आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times