सध्याच्या घडीला जगभरात करोना व्हायरसमुळे चिंतेचे वातावरण आहे. करोना व्हायरसचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. आगामी सहा महिन्यांमध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक ही क्रिकेटची मोठी स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. ही स्पर्धा आता पुढच्या वर्षी खेळवावी, असे मत एका माजी क्रिकेटपटूने व्यक्त केले आहे.

सध्याच्या घडीला करोना व्हायरसचा मोठा फटका बीसीसीआयला बसला आहे. बीसीसीआयला एकदिवसीय मालिका रद्द करावी लागली होती. त्याचबरोबर आता आयपीएल अनिश्चित कालासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे आता विश्वचषक होणार की नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषक १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे.

याबाबत न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम म्हणाला की, ” करोना व्हायरसचे सावट सध्याच्या घडीला क्रीडा विश्वावर आहे. माझ्यामते ट्वेन्टी-२० विश्वचषक हा पुढे ढकलायला हवा. हा विश्वचषक पुढच्या वर्षी खेळवला जाऊ शकतो. या विश्वचषकाच्या कालावधीमध्ये आयपीएल खेळवण्यात यावी.”

आयपीएल आता कधी खेळवले जाईल,याबाबत कोणालाही कल्पना नाही. पण विश्वचषकापूर्वी काही महत्वाच्या क्रिकेट स्पर्धा होणार आहेत. आशिया चषक ट्वेन्टी-२० स्पर्धा ही विश्वचषकापूर्वी खेळवण्यात येणार आहे. जर ही स्पर्धा यशस्वीरीत्या झाली तर विश्वचषक भरवायला कोणतीही समस्या आयसीसीला होणार नाही. यासाठी ऑस्ट्रेलियातील सरकार त्यांना कसा पाठिंबा देते यावर सर्व काही अवलंबून असेल. कारण सहा महिने आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करणार असल्याचे यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या सरकारने सांगितले आहे. त्यामुळे जर विमान सेवा बंद राहील्या तर अन्य देशांतील खेळाडू ऑस्ट्रेलियामध्ये कसे पोहोचणार, हा मोठा प्रश्न असेल.

काही दिवसांपूर्वी आयसीसीने विश्वचषक नियोजित वेळेत होईल, असा विश्वास व्यक्त केला होता. आयसीसी सध्याच्या घडीला परिस्थितीचा अंदाज घेत आहे. त्याचबरोबर सर्व देशांच्या संपर्कातही आहे. त्यामुळे जर परिस्थिती जेव्हा सामान्य हेईल, तेव्हा आयसीसी सर्व देशांची संवाद साधेल आणि त्यानंतर विश्वचषकाचा अंतिम निर्णय घेईल, असे म्हटले जात आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here