वाचा- विराट कोहलीने धोड्यांवरच पाय मारला, बाद झाल्याचा Video पाहाल तर कपाळावर हात माराल
पंत ज्या परिस्थितीत फलंदाजी करण्यास आला होता. ते पाहता अन्य कोणी असता तर थोडी संयमी फलंदाजी केली असती. पण पंतने थेट हल्ला चढवला. पंतचा राग खास करून फिरकीपटू जॅक लीचवर निघाला, त्याच्या एका ओव्हरमध्ये पंतने २२ धावा वसूल केल्या.
पंतने १११ चेंडूत १९ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने १४६ धावा केल्या. १५० धावा होतील असे वाटत असताना जो रूटच्या चेंडूवर जॅक क्रॉलीने पंतचा कॅच घेतला. पंतने शतक पूर्ण केल्यावर भारताचे कोच द्रविड यांना सर्वात जास्त आनंद झाला. नेहमी शांत आणि संयमी दिसणारे द्रविड यांनी मात्र उत्साहात बाल्कनीत आले आणि त्यांनी पंतचे अभिनंदन केले. द्रविडने एका जाहिरातीत इंद्रानगरचा गुंड अशी व्यक्तीरेखा साकारली होती. काल बाल्कनीतील द्रविडचा जल्लोष पाहून चाहत्यांना त्या जाहिरातीची आठवण आली.
वाचा- जाणून घ्या कोण आहे गेरार्ड पिक; शकीराने महिलेसोबत रंगेहात पकडले आणि…
सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जडेजाने पंतला सुरेख साथ दिली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा जडेजा १६३ चेंडूत ८३ धावांवर नाबाद होता. पहिल्या सत्रात इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताला बॅकफुटला ढकलले होते. पण त्यानंतर पंत-जडेजा जोडीने धमाल केली. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सकडे याचे उत्तर नव्हते. त्याने मुख्य गोलंदाज वापरून पाहिले पण पंत-जडेजा जोडीला रोखता आले नाही.
वाचा- टॉपलेस होऊन महिला Live सामन्यात मैदानात घुसली; फोटो, व्हिडिओची जगभरात चर्चा
पंतने ८९ चेंडूत शतक पूर्ण केले. याच बरोबर त्याने महेंद्र सिंह धोनीचा २००६ मधील विक्रम मागे टाकला. धोनीने पाकिस्तानविरुद्ध ९३ चेंडूत शतक केले होते. आशिया खंडाच्या बाहेर भारताकडून झालेले हे तिसऱ्या क्रमांकाचे वेगवान शतक आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ७ बाद ३३८ धावा केल्या होत्या. जडेजासोबत मोहम्मद शमी मैदानावर आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times