वाचा-
सध्या करोना व्हायरसमुळे जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे क्रिकेटमधील अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. कालच एका सात वर्षांची चिमुरडी फलंदाजी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांची आठवण आल्याची प्रतिक्रिया दिली होती.
वाचा-
आता आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज शेन वॉर्न आणि जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनला देखील विसराल.
एका चाहत्याने फेसबुकवर हा व्हिडिओ शेअर केला असून त्यावर ८०० हून अधिक प्रतिक्रिया आल्या आहेत. काही क्रिकेट चाहत्यांनी त्याल भविष्यातील शेन वॉर्न म्हटले आहे.
वाचा-
विशेष म्हणजे या व्हिडिओच्या खाली संबंधित मुलाच्या गोलंदाजीच्या कौशल्यावर चाहत्यांची चर्चा सुरू आहे. याआधी सात वर्षांच्या परी शर्माचा व्हिडिओ असाच व्हायरल झाला होता. परी आपल्या घरात फलंदाजीचा सराव करताचा हा व्हिडिओ पाहून इंग्लंडचे माजी कर्णधार माईक आर्थरटन तिच्या प्रेमात पडले होते. त्यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला. परीची फलंदाजी पाहून शब्दच आठवत नाहीत, असे कौतुक त्यांनी केले होते.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times