भारताचा कर्णधार विराट कोहली हा आजचा दिवत कधीच विसरू शकत नाही. कारण आजच्या दिवशी विराटच्या आयुष्यात अशा काही अविस्मरणीय गोष्टी घडल्या आहेत की, कोहली आजचा दिवस कदापी विसरू शकत नाही.

भारताबरोबर कोहलीकडे आयपीएलमधील आरसीबी संघाचे कर्णधारपदही आहे. पण कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबीला अजून एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावता आलेले नाही. पण विराट कोहली आणि आरसीबीचे खेळाडू आजचा दिवस कधीही विसरू शकणार नाहीत, कारण आजच्या दिवशी दोन महत्वाच्या गोष्टी घडल्या होत्या. या दोन्ही गोष्टी संघासाठी फार महत्वाच्या आहेत.

नेमके काय घडले होते…आजचा दिवशी दोन अशा घटना घडल्या होत्या की, त्या विसरता येऊच शकत नाहीत. आजच्या दिवशी २३ एप्रिल पण २०१३ साली आरसीबीने एक इतिहास लिहीला होता. आजच्या दिवशी आयपीएलमधील सर्वाधिक धावसंख्या आरसीबीने रचली होती. आरसीबीचा धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेलतने आजच्या दिवशी तुफानी फलंदाजी केली होती. हा सामना आरसीबी आणि पुणे वॉरियर्स यांच्यामध्ये झाला होता. या सामन्यात आरसीबीने पाच फलंदाज गमावत २६३ धावांचा डोंगर रचला होता. आरसीबीचा २६३ धावांचा विक्रम अजूनही आयपीएलमध्ये अबाधित आहे. त्यामुळे आजचा दिवस आरसीबी कधीही विसरणार नाही.

ही शर्मनाक गोष्टही आजच घडली…आजच्या दिवशी २०१३ साली आरसीबीने सर्वाधिक धावसंख्या रचली होती. पण त्यानंतर चार वर्षांनीच आरसीबीबाबत एक शर्मनाक गोष्ट घडली होती. २३ एप्रिल २०१७ साली आरसीबी आणि कोलकाताना नाईट रायडर्स यांच्यामध्ये एक सामना खेळवला गेला होता. या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाने लाजीरवाणा विक्रम आपल्या नावावर केला होता. या सामन्यात आरसीबीचा संघ फक्त ४९ धावांवर सर्वबाद झाला होता.

आजच्या दिवशीच आरसीबीच्या संघाने सर्वाधिक धावांचा विक्रम प्रस्थापित केला होता. त्याचबरोबर आजच्या दिवशीच आरसीबीच्या नावावर निचांकी धावसंख्याही नोंदवण्यात आली. त्यामुळे आजचा दिवस विराट कोहली, आरसीबी संघ, संघातील खेळाडू आणि त्यांचे चाहते कधीही विसरू शकणार नाहीत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here