रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात खालच्या दर्जाची भाषा वापरून वैयक्तिक पातळीवर टीका केली होती. त्यानंतर देशभरात या गोष्टीवरून गदारोळ सुरु झाला. बऱ्याच जणांनी अर्णब गोस्वामी यांना धारेवर धरले. पण आता त्यांचे समर्थन करायला भारताची महिला कुस्तीपटू आणि भाजपाची नेता बबीता फोगट पुढे आली आहे.

पालघरच्या घटनेच्या निमित्ताने, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात खालच्या दर्जाची भाषा वापरून वैयक्तिक पातळीवर टीकाटिपण्णी करणे व सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांनी केला असल्याचे म्हटले जात आहे. सध्याच्या घडीला देशामध्ये करोना व्हायरसमुळे चिंतेचे वातावरण आहे. या वातावरणात करोना व्हायरसशी लढण्यासाठी सर्वांनी एकजूट दाखवायला हवी, असे म्हटले जात आहे. त्यामुळे अर्णब यांच्या वक्तव्याने देशभरात दुही माजली असल्याचे बोलले जात आहे.

अर्णब गोस्वामीचं समर्थन करताना बबीताने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये बबीताने म्हटले आहे की, ” देश बदलला आहे, कोणी तरी त्यांना समजवायला हवे. लाठी-काठीने देशाचा आवाज कुणी बदलू शकत नाही. त्यामुळे घाबरायची गरज नाही. तुम्ही त्यांना सडेतोड उत्तर द्या.”

पालघर येथील मॉब लिंचिंगची घटनेबाबत बबीताने एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये बबीताने म्हटले होते की, ” महाराष्ट्रातील पालघर येथे पोलिसांसमोर तीन संतांची हत्या करण्यात आली. ठाकरे सरकार झोपा काढतंय का? त्यांना लाज वाटली पाहिले. सर्व दोषी कॅमेरामध्ये स्पष्टपणे दिसत आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई केली गेली पाहिजे.” या पोस्टनंतर बबीता चांगलीच ट्रोल झली होती.

काही दिवसांपूर्वी बबीताने तबलीगी जमातवर जोरदार टीका केली होती. तिच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर तिच्यावर बऱ्याच जणांनी टीकाही केली होती.या पोस्टमध्ये बबीताने, करोना व्हायरस भारताची दुसरी मोठी समस्या आहे. तर ‘तबलिगी जमात’ ही अद्याप नंबर एकवर आहे, असे लिहीले होते. या तिच्या पोस्टनंतरही जोरदार टीका झाली होती.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here