मुंबई: मास्टर ब्लास्टर आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा आज ४७वा वाढदिवस आहे. देशात करोना व्हायरसमुळे लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळेच सचिनने वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले आहे. सर्व जण सचिनला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. क्रिकेटमधील या दिग्गज क्रिकेटपटूला वाढदिवसाची एक अनमोल भेट मिळाली आहे.

वाचा-
लॉकडाऊमुळे सचिन कुटुंबासोबत घरी आहे. गेल्या काही दिवासांसून सचिन देशातील नागरिकांना करोनापासून वाचण्यासाठी आवाहन करत आहे. गेल्या अनेक वर्षात जेव्हा जेव्हा सचिनचा वाढदिवस आला तेव्हा तो मोठ्या जल्लोषात साजरा केला जात असे. सचिन कुठे असेल तेथे सर्वांनी त्याचा वाढदिवस साजरा केला जायचा. पण यावर्षी करोनामुळे जल्लोष शक्य नाही.

वाचा-

काल हरभजन सिंगने रोहित शर्मासोबतच्या इंस्टाग्राम चॅटवर सचिनचा वाढदिवस आजच्या नियोजित आयपीएलमधील मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई यांच्यातील सामन्यानंतर साजरा करणार असल्याचे ठरवल्याचे म्हटले होते. पण करोनामुळे आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्याने सचिनचा वाढदिवस खेळाडूंना साजरा करता आला नाही.

वाचा-

सचिनने वाढदिनी एक ट्विट पोस्ट केली आहे. या ट्विटमध्ये दोन फोटो आहेत. पहिल्या फोटोत तो वाढदिनी आईच्या पाया पडून आशीर्वाद घेताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत त्याची आई एक फोटो देत असल्याचे दिसते. सचिनच्या आईने वाढदिनी त्याला श्री गणेशाचा फोटो दिला.

वाचा-

आजच्या दिवशाची सुरुवात आईचे आशीर्वाद घेऊन केली. तिने गणपती बाप्पाचा फोटो मला दिला. ही भेट माझ्यासाठी अमुल्य असल्याचे सचिनने म्हटले आहे.

हे देखील वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here