सलामीला आल्यावर रोहित शर्मा जेव्हा एखादी मोठी खेळी साकारतो, तेव्हा भारत सामना जिंकतो. त्याचबरोबर विराट कोहली जेव्हा खेळपट्टीवर ठाण मांडतो, तेव्ही भारत जिंकतो, असे पाहायला मिळाले आहे. पण हे दोघे बाद झाल्यावर भारताला सामना जिंकता येत नाही, असे मत एका भारताच्या फिरकीपटूने व्यक्त केले आहे.
विराट आणि रोहित लवकर बाद झाल्यावर भारताने ७० टक्के सामने गमावले आहेत. त्यामुळे भारतीय संघ विजयासाठी या दोन फलंदाजांवर मुख्यत्वेकरून अवलंबून असतो, असे वक्तव्य भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने केले आहे.
एका मुलाखतीमध्ये हरभजन म्हणाला की, ” सध्याच्या भारतीय संघ फलंदाजीसाठी जास्तकरून रोहित आणि विराट यांच्यावर अवलंबून असल्याचे पाहायला मिळते. विराट आणि रोहित बाद झाल्यावर भारतीय संघ ७० टक्के सामन्यांमध्ये पराभूत झाल्याचे पाहायला मिळाले आहे. हे दोघे बाद झाल्यावर भारतीय संघाचा आत्मविश्वास हरवलेला वाटतो. काही वर्षांपूर्वी भारतीय संघात अशी परिस्थिती नव्हती. कारण जर सलामीवीर किंवा तिसरा फलंदाज लवकर बाद झाला तर मधली फळी मजबूत होती. युवराज सिंग, राहुल द्रविडसारखे फलंदाज सामना जिंकवून द्यायचे. सध्याच्या भारतीय संघात गुणवत्तेची कमी नाही पण मॅच विनर नक्कीच कमी आहेत.”
हरभजन पुढे म्हणाला की, ” भारतीय संघातील फलंदाजांना वाटते की, जर पहिले तीन फलंदाज मोठी खेळी साकारतील तेव्हाच आम्ही जिंकू शकतो. भारतीय संघ पहिल्या तीन फलंदाजांवर निर्भर असल्याचे दिसत आहे. विश्वचषकातही भारतीय संघ उपांत्य फेरीत पराभूत झाला त्याचेही कारण हेच होते. या सामन्यात पहिले तीन फलंदाज झटपट बाद झाले आणि भारताने सामना गमावला होता. ”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times