भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा आज ४७ वा वाढदिवस आहे. सचिनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांना आयसीसीने एक प्रश्न विचारला होता. यामध्ये आयसीसीने दोन खेळी चाहत्यांपुढे ठेवल्या होत्या. यावेळी चाहत्यांची ही लढत चांगलीच रंगतदार झाली. कारण यावेळी दोन्ही लढतींमध्ये फरक होता तो फक्त दोन टक्क्यांचा. कारण जी खेळी नंबर वन ठरली तिला ५१ टक्के मिळाले, तर जी खेळी दुसरी ठरली तिला ४९ टक्के मिळाल्याचे पाहिले गेले.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज ४७ वा वाढदिवस आहे. करोनामुळे सचिनने यावेळी वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले आहे. या निर्णामुळे सचिनने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली. आज करोनामुळे सर्वजण घरात थांबले आहेत आणि सोशल मीडियावरून त्याला शुभेच्छा देत आहेत. क्रिकेट मैदानावर दोन दशक अधिराज्य गाजवणाऱ्या सचिनने अशी कामगिरी केली आहे की ज्याच्या जवळपास देखील कोणाला पोहोचता आला नाही. भारतीय संघातील असे अनेक खेळाडू आहे जे सचिनला फलंदाजी करताना पाहून मोठे झाले. सचिनने केलेले विक्रम हे या खेळाडूंसाठी एक मैलाचा दगडच वाटतात.

आयसीसीने यावेळी दोन सचिनच्या खेळी चाहत्यांपुढे ठेवल्या होत्या. या दोनपैकी सर्वोत्तम खेळी कोणती, यावर आयसीसीने चाहत्यांची मते मागवली होती. त्यानुसार चाहत्यांनी या दोन खेळींना आपली मते दिली आणि आज सचिनच्या वाढदिवशी सचिनची कोणती खेळी चाहत्यांना आवडते, हे पुढे आले आहे.

या दोन खेळी कोणत्या…आयसीसीने कोणत्या दोन खेळी चाहत्यांपुढे ठेवल्या होत्या, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. यामध्ये पहिली खेळी होती सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शारजाह येथे १९९८ साली खेळलेली १४३ धावांची खेळी. त्याचबरोबर २००३ साली पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील सचिनची ९८ धावांची खेळीही यामध्ये होती. चाहत्यांनी यावेळी ५१ टक्के मतदान सचिनच्या शारजा येथील खेळीला केले आहे. त्यामुळे सचिनची ही खेळी चाहत्यांच्या मते सर्वोत्तम असल्याचे दिसत आहे. याबाबतचे एक ट्विट आयसीसीने केले आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here