सध्याच्या घडीला करोना व्हायरसमुळे भारतामध्ये ३मेपर्यंत लॉकडाऊन आहे. हे लॉकडाऊन पुढे वाढवलेही जाऊ शकते. लॉकडाऊनमुळे सध्याच्या घडीला सर्व क्रीडा स्पर्धा रद्द केल्या आहेत किंवा पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे खेळाडूंना सराव करायलाही मिळत नसल्याचे दिसत आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीही सध्या घरीच आहे. घरी बसून कोहलीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत एक वक्तव्य केले आहे.

यंदा आयपीएल ही २९ मार्चपासून सुरु होणार होती. त्यानंतर आयपीएलवर १५ एप्रिलला निर्णय येणे अपेक्षित होते. पण सध्याच्या घडीला आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे खेळाडूंना घरी बसावे लागत आहे. आता सरकारच्या निर्णयानंतरच आयपीएल खेळवण्याचा विचार बीसीसीआय करत आहे.

कोहली म्हणाला की, ” सध्याच्या घडीला लॉकडाऊनमुळे घरातच सर्व जण सुरक्षित राहू शकतात. त्यामुळे सकाळी जॉगिंगलाही लोकांनी जोखीम घेऊन जाऊ नये. काही व्यक्ती स्वत:चा जीव धोक्यात घालून इतरांची मदत करत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला माणूसकीचे दर्शन काही जणांकडून पाहायला मिळत आहे.”

कोहली पुढे म्हणाला की, ” भारतामध्ये बऱ्याच कालावधीपासून लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे काही गोष्टी आटोक्यात आलेल्या आहेत. भारताचे पंतप्रधानही या काळात चांगले काम करत आहेत. लोकंही सकारात्मकपणे त्यांना पाठिंबा देताना दिसत आहे. आपल्या देशातील लोकांनी चांगला पाठिंबा दिल्यामुळेच भारतातील परिस्थिती चांगली आहे. लोकांची प्रतिकार शक्तीही चांगली असल्यामुळे वाईट गोष्टी घडताना दिसत नाहीत.”

कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा हे भारतीय फलंदाजीचे दोन आधारस्तंभ आहेत. या दोघांनी आतापर्यंत भारताला बरेच सामने जिंकवून दिले आहेत. पण हे दोघे जेव्हा आऊट होतात, तेव्हा भारत सामना हरतो, असा धक्कादायक खुलासा एका भारताच्याच क्रिकेटपटूने केला आहे.

सलामीला आल्यावर रोहित शर्मा जेव्हा एखादी मोठी खेळी साकारतो, तेव्हा भारत सामना जिंकतो. त्याचबरोबर विराट कोहली जेव्हा खेळपट्टीवर ठाण मांडतो, तेव्ही भारत जिंकतो, असे पाहायला मिळाले आहे. पण हे दोघे बाद झाल्यावर भारताला सामना जिंकता येत नाही, असे मत एका भारताच्या फिरकीपटूने व्यक्त केले आहे.

विराट आणि रोहित लवकर बाद झाल्यावर भारताने ७० टक्के सामने गमावले आहेत. त्यामुळे भारतीय संघ विजयासाठी या दोन फलंदाजांवर मुख्यत्वेकरून अवलंबून असतो, असे वक्तव्य भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने केले आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here