जर तुम्ही धावा केल्या नाही तर आम्हाला वाटते की काही तरी गडबड आहे. आम्हाला फक्त एकच गोष्ट दिसते ती म्हणजे तुझी कामगिरी. जर तुम्हाला कामगिरी करता येत नसेल तर लोकांकडून गप्प बसण्याची अपेक्षा करू नका. तुम्ही बॅट आणि फक्त कामगिरी बोलली पाहिजे आणि कोणी नाही. कपिल देव यांनी काही दिवसांपूर्वी विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर वरील मत मांडले होते. कपिल देव यांचे म्हणणे अगदी योग्यच आहे. धावा केल्या नाही तर लोक प्रश्न उपस्थित करणारच पण किती धावा करणे गरजेचे आहे? विराट सारख्या खेळाडूकडून प्रत्येक मालिकेत शतकाची अपेक्षा केली जाते. गेल्या अडीच वर्षापासून त्याला शतक करता आले नाही.

विराट कोहली

विराट कोहली

विराट पुन्हा फ्लॉप ठरला

बर्मिंघम येथे सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत विराट पुन्हा फ्लॉप ठरला. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे चाहते आणि समालोचक भडकले. त्याच्यावर होणाऱ्या टीकेच्या दरम्यान एक संयमी मत समोर आले आहे. हे मत इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू ग्राएम स्वान यांने व्यक्त केले आहे. स्वानच्या मते विराट कोहलीवर थोडी जास्तच टीका केली जात आहे. विराटची कसोटीमधील सरासरी ५०च्या खाली गेली असली तरी सध्या खेळणाऱ्या फलंदाजांपेक्षा उत्तम आहे.

५ सामन्यात २६२ धावा

इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत विराटने पहिल्या डावात ११ आणि दुसऱ्या डावात २० धावा केल्या. पहिल्या डावात मॅटी पॉट्सने त्याला बाद केले. तो चेंडू खेळायचा की सोडायचा हे विराटला ठरवता आले नाही. दुसऱ्या डावात त्याने चार चौकार मारले असे वाटत होते की तो रंगात आलाय. पण बेन स्टोक्सच्या अतिशय सुरेख चेंडूवर तो बाद झाला. अतिरिक्त बाउंस आणि अतिरिक्त स्विंग असलेल्या त्या चेंडूवर विराट काय तर कोणताही फलंदाज टीकला नसता. २०२१ मध्ये झालेल्या या मालिकेतील ४ सामन्यात विराटने २३१ धावा केल्या. याचा अर्थ ५ सामन्यात त्याने २६२ धावा केल्या.

२०१९ नंतर गाडी घसरली

विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अखेरचे शतक २२ नोव्हेंबर २०१९ साली बांगलादेशविरुद्ध केले होते. याला आता ९५३ दिवस झालेत. २०२० साली विराटने १८ कसोटीच्या ३२ डावात २७.२५च्या सरासरीने ८७२ धावा केल्या. यात सहा अर्धशतक आणि चार डावात तो शून्यावर बाद होता. २०१९ मध्ये त्याने ५४.९८च्या सरासरीने १ हजारहून अधिक धावा केल्या. ही सरासरी आता ४९.५ झाली आहे.

चांगली फलंदाजी केली पण…

२०१८ साली विराट कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी होता. २१ ऑगस्ट २०१८ रोजी विराट ९३७ गुणांसह अव्वल स्थानावर होता. आता विराट १०व्या स्थानावर आहे. त्याचे २०० गुण कमी झाले असून ते आता ७४२ इतके आहेत. २०१८-१९च्या सत्रापासून गोष्टी बिघडण्यास सुरुवात झाली. एकाही मालिकेत तो मोठी धावसंख्या करू शकला नाही. असे नाही की या काळात त्याने चांगली फलंदाजी केली नाही. फक्त चाहत्यांच्या अपेक्षेनुसार धमाका करू शकला नाही.

किंग विराट

विराटने अखेरचे शतक केल्यानंतर ७५ आंतरराष्ट्रीय डाव खेळले आहेत. यात त्याने ३६.८९च्या सरासरीने २ हजार ५०९ धावा केल्या असून त्यामध्ये २४ अर्धशतकांचा समावेश आहे. या काळात नाबाद ९४ ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली. विराटची कामगिरी सरासरी ठरली फक्त किंग विराट प्रमाणे त्याने धावा केल्या नाहीत. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक सरासरी असलेल्या फलंदाजांच्या टॉप ३० मध्ये असे दोन फलंदाज आहेत जे सध्या क्रिकेट खेळत आहेत. यात विराट कोहली आणि जो रूट यांचा समावेश आहे. गेल्या अडीच वर्षात त्याला चांगली कामगिरी करता आली नसली तरी विराटची सरासरी ४९.५३ इतकी आहे. तर शानदार फॉर्ममध्ये असलेल्या रुटची ५०.०७ इतकी.

वनडे आणि टी-२०मध्ये अव्वल

वनडे क्रिकेटमध्ये विराट कोहलीची सरासरी ५८.०७ इतकी आहे. २६० सामन्यापैकी तो ३९ सामन्यात नाबाद राहिलाय. वनडेत सर्वाधिक सरासरी असलेल्या खेळाडूमध्ये विराट चौथ्या स्थानावर आहे. टी-२० क्रिकेटमध्ये विराटची सरासरी ५०च्या पुढे आहे. ९७ सामन्यात त्याने ५१.५च्या सरासरीने ३ हजार २९६ धावा केल्या. विराट पेक्षा एकाही फलंदाजाची सरासरी जास्त नाही.

​विराटला जास्त ऐकवले जाते?

स्वानच्या मते भारतीय समालोचक विराटवर जास्त कठोर टीका करत आहेत. तो म्हणाला, तुम्हाला जे काही म्हणायचे आहे ते म्हणू शकता. मला फरक पडत नाही. पण समकालिन क्रिकेटमध्ये असा कोणता फलंदाज आहे जो त्या चेंडूवर बाद झाला नसता. असे झाले तर तो लकी फलंदाज ठरला असता. अखेर तो एक लकी कॅच देखील होता. स्वान विराट दुसऱ्या डावात ज्या पद्धतीने बाद झाला त्यावर बोलत होता. विराटने स्वत:ची उंची फार मोठी केली आहे. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

स्थान धोक्यात

विराट त्याच्या फलंदाजीने प्रभाव पाडू शकला नाही. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२१च्या आधी त्याने टी-२०चे कर्णधारपद सोडण्याचे जाहीर केले. त्यानंतर वनडे संघाचे कर्णधारपद काढून घेतले गेले. कसोटीत यशस्वी कर्णधार ठरलेल्या विराटने ६४ पैकी ३९ मध्ये विजय मिळून दिला. पण द.आफ्रिकेत झालेल्या पराभवानंतर विराटने कसोटी कर्णधारपद देखील सोडले. असे वाटत होते की कर्णधारपद सोडल्यानंतर त्याची फलंदाजी सुधारेल. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. अजून ३-४ मालिकेत खराब फॉर्म कायम राहिला तर फलंदाज म्हणून त्याचे स्थान धोक्यात येऊ शकते.

virat

virat

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here