वाचा-
करोनाचा सर्वात जास्त फटका क्रिकेट ऑस्ट्रेलियाला झाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाला करोनामुळे जवळपास ३० कोटी डॉलर इतके नुकसान झाले आहे. बोर्डाची अवस्था इतकी खराब झाली आहे की त्यांनी ८० टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया सरकारने बोर्डाची मदत करण्याचे ठरवले आहे.
वाचा-
बोर्डावर आलेले आर्थिक संकट कमी करण्यासाठी या वर्षाच्या अखेरीस भारतीय क्रिकेट संघाच्या दौऱ्याला सरकारकडून परवानगी मिळण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाने ३० सप्टेंबरपर्यंत सर्व बॉर्डर बंद केल्या असून हवाई वाहतुकीवर बंदी घातली आहे. भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात नियोजित आहे. पण करोना संकट पाहता ऑस्ट्रेलिया सरकार हवाई वाहतुकीवरील बंदी वाढवू शकते.
वाचा-
पण क्रिकेट बोर्डाची अवस्था पाहून सरकार भारतीय संघाच्या दौऱ्यासाठी सूट देऊ शकते. एका रिपोर्टनुसार सरकारकडून भारतीय संघाच्या प्रवासासाठी सूट देण्याचा विचार सुरू आहे. यामुळे ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाचे नुकसान कमी होईल. ऑस्ट्रेलिया बोर्डाला यासंदर्भात सरकारकडून सकारात्मक उत्तर मिळाल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
वाचा-
भारत दौऱ्यामुळे ऑस्ट्रेलिया बोर्डाला ५० कोटी डॉलरचे उत्पन्न मिळण्याची आशा आहे. ही रक्कम अधिकतर प्रसारणाचे हक्क दिल्याने मिळू शकते. पण खेळ फक्त जर टीव्हीवर दाखवण्यात आला तर त्यामुळे ५ कोटी डॉलरचे नुकसान होईल.
भारतीय संघाचा दौरा रद्द झाला तर ऑस्ट्रेलिया बोर्डाचे मोठे नुकसान होईल.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times