नवी दिल्ली: करोना व्हायरसमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा स्थगित झाल्या आहेत. लॉकडाऊनमुळे सर्व जण घरी असेल तरी लोकांना नव्याने क्रीडा स्पर्धा पाहता येत नाहीत. ऑलिम्पिकपासून ते आयपीएलपर्यंतच्या स्पर्धा पुढे ढकलल्या आहेत. अशातच क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. करोना धोका कायम असताना एक क्रिकेट लीग स्पर्धा सुरू होणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचे घरी बसल्या चांगले मनोरंजन होणार आहे.

वाचा-

आजपासून म्हणजे २५ एप्रिलपासून ताइपेइ येथे टी-१० लीग स्पर्धा सुरू होत आहे. तायवान टी-१० लीग २०२० या स्पर्धेत आठ संघ खेळत आहेत. या स्पर्धेतील सर्व सामने शनिवार आणि रविवारी होणार आहेत. ही स्पर्धा १७ मे पर्यंत चालणार आहे.

वाचा-

वाचा-

टी-१० लीगमध्ये सिंचू टायटन्स, ताइपेइ डेअरडेव्हिल्स, टीसीए इंडियन्स, चेयाई स्विंगर्स, पीसीसीटी युनायडेट, आयसीसीटी स्मॅशर्स, ताइपेइ ड्रॅगस आणि एफसीसी फॉर्मोसांस हे संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील संघांना दोन गटात विभागण्यात आले आहे. प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध प्रत्येकी ३ सामने खेळणार आहे. त्यानंतर अंतिम सामना १७ मे रोजी होईल.

करोना व्हायरसमुळे क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन, हॉकी, फुटबॉल आदींमधील स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. क्रिकेट चाहत्यांच्या मनोरंजनासाठी काही दिवासांपासून जुने सामने पुन्हा दाखवण्यात येत आहेत. पण स्पर्धेमुळे क्रिकेट चाहत्यांना लाइव्ह नवे सामने पाहता येतील.

तैवानमध्ये फक्त क्रिकेटच नाही तर बेसबॉल स्पर्धा देखील सुरू आहेत. चीनच्या अगदी जवळ असलेल्या तैवानमध्ये करोनाचे ४२२ रुग्ण आढळले आहेत तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तैवान आणि चीनचे आर्थिक संबंध असताना देखील त्यांनी करोना व्हायरसला नियंत्रणात ठेवले आहे. यामुळेच तैवानचे जगभरात कौतुक होत आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here