मुंबई: करोना व्हायरसमुळे आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. अशात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघातील आणि यांनी इंस्टाग्रामवर लाइव्ह चॅट केले. या चॅटमध्ये दोघांनी अनेक गोष्टी शेअर केल्या. इतकच नव्हे तर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांचा मिळून एक क्रिकेट संघ तयार केला.

वाचा-
एबी सोबत लाइव्ह चॅट सुरू असताना विराटचे अनुष्कासाठीचे प्रेम समोर आले. या लाइव्ह चॅट दरम्यान विराट ज्या रुममध्ये बसला होता तेथे प्रकाश कमी दिसत होता. तेव्हा अनुष्काने लाइट लावून दिली. त्यावर विराटने असे म्हणत तिचे आभार मानले.

वाचा-

विराटचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एबी सोबत बोलताना विराटने करोना व्हायरसबाबत चर्चा केली. मी या (बेंगळुरू) संघाला सोडण्याचा कधीच विचार करू शकत नाही. जोपर्यंत आयपीएल खेळेन मी बेंगळुरू सोबत असेन आणि आपल्या दोघांना माहीत आहे की RCB ला आयपीएलचे विजेतेपद मिळवायचे आहे.

वाचा-

वाचा-
करोना व्हायरसमुळे बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा प्रथम १५ एप्रिलपर्यंत आणि नंतर अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे. बेंगळुरू संघाचे नेतृत्व विराट कोहली करत आहे आणि त्यांना अद्याप एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. त्यामुळे विराट आणि एबीचा प्रयत्न आहे की येणाऱ्या आयपीएलमध्ये सर्वोत्तम कामगिरी करून बेंगळुरू संघाला पहिले विजेतेपद मिळवून द्यायचे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here