नवी दिल्ली: क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या आणि अनेक विक्रम करणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा काल ४७वा वाढदिवस झाला. सर्वाधिक शतक, सर्वाधिक धावा करणाऱ्या सचिनने त्याच्या करिअरमधील एक असा प्रसंग सांगितला आहे जो त्याने याआधी कधीच शेअर केला नव्हता.

वाचा-
भारताच्या या दिग्गज फलंदाजाने १९८९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पाकिस्तानमधील या पहिल्या दौऱ्यातील अनुभव सचिनने शेअर केला. सचिनने क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले असेल तरी त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सुरुवात चांगली नव्हती. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सचिन फक्त १५ धावांवर बाद झाला होता. पहिल्या डावाबद्दल बोलताना सचिन म्हणाला, वासीम अक्रम आणि वकार युनिस यांची गोलंदाजी खेळल्यानंतर मला अशी जाणीव झाली की मी या स्तरावर खेळण्याच्या लायक नाही. अवघ्या १५ धावांवर बाद झाल्यानंतर मी रडलो होतो.

वाचा-
इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन याच्या सोबत ऑनलाईन गप्पांमध्ये सचिनने त्याचे अनुभव शेअर केले. वसीम आणि वकार प्रचंड वेगाने चेंडू टाकत होते. ते शॉट चेंडू सातत्याने टाकत होते आणि प्रत्येक चेंडू भीतीदायक वाटायचा. मी त्याआधी असा अनुभव कधीच घेतला नव्हता. त्यामुळे माझा हा पहिला परदेशी दौरा नक्कीच सुखद नव्हता.

वाचा-
त्या दोघांच्या पेस आणि बाऊस चेंडूमुळे मी बीट होत होतो. त्यानंतर १५ धावांवर बाद झालो. मी जेव्हा ड्रेसिंग रुममध्ये गेले तेव्हा मला प्रचंड वाईट वाटत होते. मी हे काय केले, अशा पद्धतीने कसे काय खेळलो, असा प्रश्न मी स्वत:ला विचार होतो. ड्रेसिंग रुममध्ये आल्यानंतर मी थेट बाथरूममध्ये गेलो आणि माझ्या डोळ्यातून पाणी आले, असे सचिन म्हणाला.

वाचा-
पहिल्या मॅचनंतर मला वाटत होते की मी या स्तरावर खेळण्याच्या लायक नाही. माझा पहिला दौरा शेवटचा दौरा होईल असे वाटत होते. ही जागा माझ्यासाठी नाही. प्रचंड निराश आणि पराभव झाल्यासारखे मला वाटत होते. तेव्हा रवी शास्त्री यांन मला विचारले काय झाले? मी वेगवान चेंडूमुळे बाद झाल्याचे सांगितले.

वाचा-
त्यावर रवी शास्त्री म्हणाले, काळजी करू नकोस. तु मैदानात जा आणि फक्त अर्धा तास खेळण्याचा प्रयत्न कर. त्यानंतर त्यांच्या वेगाची तुला सवय होईल आणि सर्व काही ठीक होईल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here