हा खुलासा नक्की कोणी केला, याबाबत तुम्हाला उत्सुकता असेल. पण धोनीच्या निवकवर्तीय खेळाडूने हा खुलासा केला आहे. धोनीने आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स संघात या खेळाडूला संधी दिली होती. या संधीमुळे खेळाडूचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले होते. या संधीनंतर खेळाडूला भारतीय संघाचही स्थान देण्यात आले होते. त्यामुळे हा खेळाडू धोनीच्या जवळचा असल्याचे म्हटले जाते.
जून महिन्यात इंग्लंडमध्ये क्रिकेट विश्वचषक खेळवण्यात आला होता. या विश्वचषकानंतर धोनीने आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. धोनी ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या भारतीय संघात असेल, असे बऱ्याच जणांना वाटत आहे. धोनीला ट्वेन्टी-२० संघात स्थाडन पटकावण्यासाठी फॉर्म आणि फिटनेस या दोन्ही गोष्टी पुन्हा एकदा सिद्ध कराव्या लागतील.
भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनीच्या पुनरागमनाचा एक रस्ता दाखवला होता. शास्त्री काही महिन्यांपूर्वी म्हणाले होते की, ” धोनीने जर आयपीएलमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली तर ट्वेन्टी-२० विश्वचषकामध्ये धोनीला स्थान देण्यात येऊ शकते.” पण सध्याच्या घडीला आयपीएल कधी होईल, हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे धोनी आता भारताकडून खेळताना दिसणार की नाही, हे कुणीही सांगू शकणार नाही.
धोनीबाबतचा का आहे खुलासा…धोनीबाबत एका माजी खेळाडूने एक खुलासा केला आहे. यामध्ये त्याने म्हटले आहे की, ” जर धोनी हा फिट असेल आणि त्याला खेळायची इच्छा असेल तर भारताचा यष्टीरक्षक म्हणून तो माझी पहिली निवड असेल. पण मी जे काही धोनीला ओळखतो, त्यानुसार तो सध्याच्या घडीला भारताकडून खेळण्याचा विचार करत नाही. पण धोनी हा कधी कोणते सरप्राईज देईल, हे कोणीही सांगू शकत नाही. धोनीने अजूनही निवृत्तीची घोषणा केलेली नाही पण ही मुद्दा वेगळा आहे. जोपर्यं मी धोनीला ओळखतो, त्यानुसार धोनी आता भारतासाठी खेळेल, असे मला तरी वाटत नाही. पण कधीही काहीही चमत्कार होऊ शकतो.” हे वक्तव्य भारताचा माजी गोलंदाज आशीष नेहराने केले आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times