सध्याच्या घडीला वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल हा भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलवर चांगलाच भडकलेला पाहायला मिळत आहे. मला चहलचे तोंडच बघायचे नाही, असे धक्कादायक वक्तव्य गेलने केलेले आहे.

सध्याच्या घडीला देशात करोना व्हायरस पसरलेला आहे. त्यामुळे देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे यंदाची आयपीएलही पुढे ढकल्यात आली आहे. त्यामुळे खेळाडू आपल्या घराच बसून आहेत. पण काही खेळाडू घरात शांत बसून राहिललेले नाहीत, तर सोशल मीडियावर ते काही ना काही पोस्ट करताना दिसत आहेत. चहल तर सोशल मीडियावर सुसाट असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळेच गेल त्याच्यावर भडकला आहे.

प्रत्येक गोष्टीची एक हद्द असते. ती हद्द पार केली की तुम्ही काही लोकांच्या मनातून उतरता, असेच काहीसे चहलच्या बाबतीतही घडलेले पाहायला मिळत आहे. करोना व्हायरसमुळे सर्वच जण चिंतेत आहेत. त्यामध्येच चहल काही ना काही पोस्ट करून क्रिकेटपटूंना त्रास देत आहे. पण चहलला मात्र या गोष्टीचे काहीच वाटत नाही. पण गेल मात्र चहलला चांगलाच कंटाळलेला आहे. त्याच्या चॅटींगवरून गेल भडकला आहे. त्यामुळेच त्याने आता चहलचे तोंडृही न पाहण्याचा निर्णय घेतलेला आहे. चहलने गेलबरोबर इंस्टाग्रामवर चॅटींग केले. या चॅटींगनंतर गेल चहलवर चांगलाच भडकला आहे. त्यामुळे आता चहलला सोशल मीडियावर ब्लॉक करण्याचा निर्णयही गेलने घेतला आहे.

गेल म्हणाला की, ” चहल तुझ्या बऱ्याच गोष्टींना मी आता कंटाळलेलो आहे. त्यामुळे यापुढे मला तुझे तोंड पाहण्याचीही इच्छा नाही. त्यामुळेच मी तुला सोशल मीडियावर ब्लॉक करत आहे.”

चहल आणि गेल यांची भेट दोन गोष्टींमुळे होऊ शकते. जर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये मालिका खेळवण्यात आली तर हे दोघे एकमेकांना भेटू शकतात. त्याचबरोबर जर आयपीएल खेळवण्यात आली तर हे दोघे एकमेकांसमोर उभे ठाकले जाऊ शकतात. हे दोघे जेव्हा एकमोकांसमोर येतील तेव्हा गेल चहलचे तोंड पाहणार की नाही, याची उत्सुकता आता चाहत्यांना आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here