करोनाशी लढण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे, त्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेट मालिका खेळवावी, असा प्रस्ताव पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारतापुढे ठेवला होता. त्यामुळे भारताच्या माजी क्रिकेटपटूंनी हा प्रस्ताव धुडकावून लावला होता. पण करोना व्हायरसमुळे बीसीसीआयचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यासाठी आता बीसीसीआय करोनाशी लढण्यासाठी क्रिकेट सामने खेळण्याचा विचार करत आहे.

करोना व्हायरसमुळे क्रिकेट विश्वातील बरेच देश आर्थिक संकटात सापडलेले आहे. यामध्ये भारत आणि इंग्लंड या क्रिकेट मंडळांवर आर्थिक संकट ओढावलेले नाही. पण क्रिकेट विश्वातील काही छोटे देश आर्थिक संकटात सापडले आहे. त्यांना मदत करण्यााठी आता बीसीसीआय त्यांच्याबरोबर क्रिके खेळण्याचा विचार करत आहे.

भारताचा क्रिकेट संघ श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे आणि साउथ आफ्रिका या देशांचा दौरा करणार आहे. पण ज्या देशांना आर्थिक चणचण असेल त्यांना मदत करण्यासाठी बीसीसीआय विचार करणार असल्याचे समजत आहे. यासाठी काही सामने भारतात आयोजित केेल जाऊ शकतात, असेजही ्हटले जात आहे.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ” ऑस्ट्रेलियातील विश्वचषक ऑक्टोबर महिन्यात होणार आहे, पण या विश्वचषकात आठ संघ सहभागी होतील, याचा गंभीरपणे विचार आयसीसी करत आहेत का? या देशांमधील सरकार आपल्या संघाला परदेशात जायला परवानगी देणार का? सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलिया भारताच्या दौऱ्याबाबत विचाराधीन आहे. पण भारताबरोबर एकाच ठिकाणी सामने खेळवण्याचा ऑस्ट्रेलिया विचार करत आहे. या परिस्थितीत ऑस्ट्रेलिया विश्वचषकात आठ देशांची व्यवस्था कशी करणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.”

बीसीसीआयच्या या अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, ” भारतीय संघ फार कमी अवधीमध्ये दुसऱ्या देशांचा दौरा करू शकतो. त्याचबरोबर आर्थिक नुकसान टाळण्यासाठी बीसीसीआय अन्य देशांनाही मदत करु शकते. भारतामध्ये ज्या काही मालिका होतील, त्यामध्ये काही अतिरीक्त सामने आयोजित करण्यात येऊ शकतात. या मालिकेतून जी काही कमाई होईल, त्याचा एक हिस्सा बीसीसीआय अन्य देशालाही देऊ शकते.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here