पुणे: वय वर्ष फक्त सहा, नाव आहे , राहणार आणि आवड आहे क्रिकेट, क्रिकेट आणि फक्त क्रिकेट… स्वराचा एक व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओने स्वराला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवले आहे.

घरीत आपल्या भावांसोबत क्रिकेट खेळत असलेला स्वराच्या एक व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या व्हिडिओत स्वराची क्रिकेट कौशल्य पाहून अनेक दिग्गज आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू हैराण झाले आहेत.

वाचा-
हा व्हिडिओ पाहून न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक आणि आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे सल्लागार माइक हेसन यांनी स्वराचे कौतुक केले आहे. माइक यांनी स्वराचा व्हिडिओ रिशेअर केला आहे. ते म्हणतात नाव लक्षात ठेवा, स्वरा गुरव.

वाचा-

व्हिडिओमध्ये स्वरा फक्त चेंडू सहजपणे मारत नाही तर तिचा फुटवर्क कमालचा आहे. चेंडूवर तिची नजर आणि बॅट सरळ दिशेत फिरवते. म्हणूनच माइक यांनी तिचा व्हिडिओ शेअर करताना नाव लक्षात ठेवा असे म्हटले आहे. स्वराचे आताचे बॅटिंग कौशल्य पाहता तिला भविष्यात नाव कमवण्याची संधी आहे, असेच माइक यांना सुचवायचे आहे.

वाचा-

माइक यांच्या ट्वीटवर न्यूझीलंडचा माजी अष्ठपैलू खेळाडू ग्राँट एलियट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुमचा डिफेंस मजबूत पाहिजे. कारण जर स्वराने चेंडू मिस केला तर मागे असलेल्या टीव्हीवर तो लागू शकतो. त्यावर माइक म्हणाले, तु इतक्या लवकर अंदाज बांधू नको.

वाचा-
भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज देखील स्वराचा व्हिडिओ पाहून प्रभावित झाली आहे. स्वरा गेल्या दोन वर्षांपासून क्रिकेट खेळत असून सध्या लॉकडाऊनमुळे ती घरीच सराव करते.

हे देखील वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here