महाराष्ट्रातून नितेश शिंदे, शशी कुमार, आशिष चव्हाण, चैतन्य राव, निशांत परेरा, अजित आर., आदित्य शुक्ला, दीपिका कारंडे, दीपक कनोजिया, सुशांत अनवेकर, अशी दार्जिलिंगमध्ये अडकलेल्या ट्रेकर्सची नावे आहेत.
हिमालयाला ट्रेकिंग करायला त्यांनी २ मार्चला सुरुवात केली आणि २८ मार्चला त्यांचे ट्रेकिंग संपले. पण जेव्हा ट्रेकिंग संपवून ते सिक्कीममध्ये आले तेव्हा करोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन सुरु झाल्याचे त्यांच्या कामी पडले. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रामध्ये येता आले नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असेल, अशी घोषणा केली होती. त्यामुळे या सर्वांनी १५ एप्रिलचे तिकिट काढले होते, पण लॉकडाऊन वाढल्यामुळे त्यांना हे तिकिट रद्द करावे लागले. त्यानंतर ३० एप्रिलला हे लॉकडाऊन संपेल, असे त्यांना समजले तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा तिकीट काढले आणि त्यांना हे तिकीटही रद्द करावे लागले. पण आता हे लॉकडाऊन आता किती काळापर्यंत वाढेल, हे त्यांना माहिती नाही. एक महिना हे महाराष्ट्राचे १० ट्रेकर्स दार्जिलिंगमध्ये अडकले असून आता घरी कसे पोहोचायचे, हा त्यांच्यासाठी मोठा प्रश्न आहे.
“लॉकडाऊन सुरु झाल्यापासून आम्ही दार्जिलिंगमध्ये अडकले आहोत. आमची सर्व व्यवस्था हिमालयन माऊंट इंस्टिट्यूट करत आहे. गेल्या काही दिवसांपासून आम्ही महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी प्रयत्न करत आहोत. शासकीय यंत्रणांना आम्ही आवाहन केले आहे. पण आम्हाला अजून कोणताही रीप्लाय आलेला नाही,” असे चैतन्य राव यांनी सांगितले.
भारतामधून एकूण ७० ट्रेकर्स यामध्ये सहभागी झाले होते. हे ७० ट्रेकर्स सध्या दार्जिलिंगमध्ये अडकले आहेत. हिमालयन माऊंटेनरींग इंस्टिट्यूट, ही सरकारी संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून हे ट्रेकर्स हिमालयामध्ये गेले होते आणि सध्या लॉकडाऊनमुळे ते दार्जिलिंग येथे अडकलेले आहेत.
“गेले दोन महिने आम्ही घर सोडून आलेलो आहोत. मी एका जर्मनीच्या कंपनीमध्ये सेल्स इंजिनिअर आहे. या ट्रेकिंसाठी मी विनापगारी आलो होतो. सध्या दोन महिने मला पगार नाही. आता किती महिने पगाराविना राहावे लागेल, याची मला चिंता आहे. त्यामुळे जेवढ्या लवकर आम्ही घरी पोहोचू, तेच आमच्यासाठी सर्वात महत्वाचे असेल. आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ट्विटरद्वारे कळवले आहे. त्यांनी जर आमची दखल घेतली तर आम्ही घरी सुखरुप पोहोचू शकतो,” असे नितेश शिंदे यांनी सांगितले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times