नवी दिल्ली: भारतीय संघातील विकेटकिपर ऋषभ पंतने सोशल मीडियावर केलेल्या एका लाइकमुळे चाहत्यांच्या नाराजीला तोड द्यावे लागले. करोना व्हायरसमुळे क्रिकेट सामने होत नसले तरी क्रिकेटपटू लाइव्ह चॅट आणि जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. मैदानावर अनेक चूका करणाऱ्या पंतने सोशल मीडियावर ही मोठी चूक केली.

वाचा-
क्रिकेट मैदानावर केलेल्या चुकांमुळे अनेक वेळा चाहत्यांनी पंतला ट्रोल केले आहे. चाहते नेहमीच पंत आणि धोनीची तुलना करतात. पंतला अनेक वेळा संधी देऊन सुद्धा त्याला संधीचे सोने करता आले नाही. अशातच पंतने आता सोशल मीडियावर एक मोठी चूक केली.

पंतने एक व्हिडिओला लाइक केले. हा व्हिडिओ धोनी संदर्भातील होता. व्हिडिओत धोनीला विकेटकिपिंग करताना अडचणी येत असल्याचे दिसत आहे. धोनीने फलंदाजाला बाद करण्याची संधी घालवल्याचे व्हिडिओत दिसते. हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या युझरने पोस्टच्या खाली ‘क्या से क्या हो गया’, अशी ओळ लिहली आहे.

पंतने नेमके याच व्हिडिओ पोस्टला लाइक केले. पंतच्या या कृतीवर धोनीचे चाहते नाराज झाले. पंतने अनेक वेळा धोनी हा आपला आदर्श असल्याचे सांगितले आहे. पण सोशल मीडियावरील पंतची ही कृती त्याच्यासाठी अडचणीत ठरली. गेल्या काही दिवसात पंतची मैदानावरील कामगिरी चांगली झाली नाही. २०१९ च्या वर्ल्ड कपनंतर तो संघाबाहेर राहिला आहे.

अनेक वेळा संघाला गरज असताना पंत बेजबाबदारपणे बाद झाला. त्यामुळेच पंत संघाबाहेर आहे. कर्णधार विराट कोहलीने गेल्या काही सामन्यात पंतच्या ऐवजी केएल राहुल याला संधी दिली होती. सध्या करोना व्हायरसमुळे क्रिकेट स्पर्धा बंद आहेत. बीसीसीआयने आयपीएल अनिश्चितकाळासाठी स्थगित केली आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here