सध्याच्या घडीला जगभरात करोना व्हायरसने थैमान घातले आहे. या गोष्टीचा क्रीडा जगतालाही बसलेला आहे. आता करोनाला कधी पळवून लावले जाईल, याची वाट सारेच पाहत आहेत. सध्याच्या घडीला करोनाने जगभरातील लोकांना हैराण केले आहे. पण करोना व्हायरसपेक्षा एक खेळाडू भयंकर असल्याचे वक्तव्य एका क्रिकेटपटूने केले आहे.

सध्याच्या सर्वांच्याच मुखात करोना व्हायरसचे नाव आहे. करोना व्हायरसपासून आपण मुक्ती कशी मिळवू शकतो, यासाठी सर्वच प्रयत्नशील आहेत. पण करोना व्हायरसपेक्षाही काही भयंकर असेल, याचा विचारही आपण करू शकत नाही. पण सध्याच्या घडीला एक माजी क्रिकेटपटू करोना व्हायरसपेक्षा भयंकर आहे, अशी टीका करण्यात येत आहे.

कोणी केली टीका…‘करोना व्हायरसपेक्षा हा खेळाडू आहे भयंकर’ अशी टीका नेमकी कोणी केली, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर ही टीका वेस्ट इंडिजचा धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेलने केली आहे.

नेमके घडले तरी काय…करोना व्हायरसमुळे सर्वच खेळाडू घरात बसून आहेत. पण काही खेळाडूंना यावेळी व्यक्त होण्याची संधीही मिळत आहे. गेलला आगामी कॅरेबियन प्रीमिअर लीगमधून वगळण्यात आले आहे. गेल हा जमैका थलावाज संघात होता. पण यावेळी त्याला संघात स्थान देण्यात आलेले नाही. आपल्याला संघातीन माजी क्रिकेटपटू आणि या संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रामनरेश सारवान यांनी बाहेर काढल्याचे गेलचे म्हणणे आहे.

याबाबत गेल म्हणाला की, ” माणसं ही पटकन बदलतात. गेल्या वर्षी माझ्या वाढदिवसाला सारवानने मोठे भाषण केले होते. पण यावेळी मलाच संघातून बाहेर काढण्याचे कृत्य त्याने केले आहे. पाठीत खंजीर खुपसण्याचे काम सारवानने अजूनही सुरुच ठेवले आहे. माझ्यामते सारवान हा करोना व्हायरसपेक्षाही भयंकर आहे.”

गेल आणि सारवान हे वेस्ट इंडिजकडून एकत्र खेळले होते. पण सध्याच्या घडीला सारवानने निवृत्ती पत्करली असून त्याने प्रशिक्षण देणे सुरु केले आहे. एकेकाळचे एकाच संघातील खेळाडू सध्या एकमेकांचे वैरी झालेले पाहायला मिळत आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here