सध्याच्या घडीला करोना व्हायरसला कसं पराभूत करायचं, हा विचार सर्वांच्या मनात आहे. पण एका हेअरकटमुळे करोना व्हायरस बुचकळ्यात सापडू शकतो, अशी पोस्ट भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने केली आहे.

हरभजनने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये एक हेअरकट दिसत आहे. या हेअरकटमुळे करोना व्हायरस कन्फ्यूझ होईल, अशी कमेंट हरभजनने या पोस्टखाली केली आहे.

करोना व्हायरसमुळे सध्याच्या घडीला भारतामध्ये लॉकडाऊन आहे. त्यामुळे खेळाडूंना घरीच बसावे लागत आहे, त्यांना सरावही करता येत नाहीए. त्यामुळे हे खेळाडू सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट टाकत असतात. हरभजननेही अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे, ही पोस्ट आता चांगलीच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

हरभजनने केलेल्या या पोस्टमध्ये एका मुलाचे केस कापले जात आहेत. या मुलाचा एक अनोखा हेअरकट फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. या मुलाच्या डोक्याच्या मागच्या बाजूवर हा हेअरकट करण्यात आला आहे. या हेअरकटमध्ये डोळे, नाक, तोंड सारे काही दिसत आहे. त्यामुळे हरभजनने हा फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टखाली हा हेअरकट पाहून हरभजनने लिहिले आहे की, ” हा हेअरकट पाहून करोना व्हायरसही बुचकळ्यात पडेल की, नेमके शरीरात शिरायचे कुठून…”

सध्या सर्वच जण करोना व्हायरसने त्रस्त झालेले आहे. बरेच लोकं घरात राहून वैतागलेले आहेत. या लोकांना थोडेसे हसवण्यासाठी आणि ही परिस्थिती विसरवण्यासाठी हरभजनने ही पोस्ट केल्याचे दिसत आहे. सध्याच्या सर्वांच्याच मुखात करोना व्हायरसचे नाव आहे. करोना व्हायरसपासून आपण मुक्ती कशी मिळवू शकतो, यासाठी सर्वच प्रयत्नशील आहेत. पण यावेळी लोकांना थोडासा विरंगुळा मिळावा आणि ते पुन्हा एकदा फ्रेश होऊन करोना व्हायरसशी दोन हात करण्यासाठी सज्ज व्हावेत, यासाठी हरभजन प्रयत्न करताना दिसत आहे. यापूर्वी हरभजनने लॉकडाऊनमध्ये सापडलेल्या गरजू लोकांना मदतही केली आहे. हरभजनने गरजूंना अन्न-धान्य पुरवण्याचे कामही केले आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here