आकारलेले शुल्क न भरल्यामुळे भारतावर विश्व अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद गमावण्याची वेळ आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या एका वृत्तानुसार भारताने स्पर्धेचे यजमानपदाचे शुल्क न भरल्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आली आहे.

विश्व अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेच्या यजमानपदाचा निर्णय आज झाला. हे यजमानपद सर्बियाला देण्यात आले आहे. या स्पर्धेच्या यजमानपदासाठी शुल्क भरावे लागते. भारताने हे शुल्क न भरल्यामुळे त्यांच्यावर हे गमावण्याची वेळ आली आहे.

“प्रत्येक स्पर्धेचे यजमानपद भूषवण्यासाठी एक प्रक्रिया असते. या प्रक्रियेनुसार जे देश स्पर्धेचे यजमानपद भूषवू इच्छितात त्यांना शुल्क भरावे लागते. भारताकडून दिल्लीमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार होती. पण त्यांनी यजमानपदाचे शुल्क भरले नाही. त्यामुळे आता त्यांच्यावर ५०० अमेरिकन डॉरल एवढा दंड ठोठावण्यात येणार आहे,” असे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेने सांगितले आहे.

भारताने पहिल्यांदाच या स्पर्धेच्या यजमानपदासाठी आपला अर्ज दाखल केला होता. हा अर्ज २०१७मध्ये दाखल करण्यात आला होता. भारताला ही स्पर्धा दिल्लीमध्ये भरवायची होती. पण स्पर्धेच्या यजमानपदासाठी ठराविक शुल्क आकारले जाते. हे शुल्क भरण्यात भारतीय बॉक्सिंग संघटना अपयशी ठरली. त्यामुळेच विश्व अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद त्यांना आता भूषवता येणार नाही.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here