नवी दिल्ली: १९९६ सालचा आयसीसी वर्ल्ड कप भारत,पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात खेळवण्यात आला होता. या वर्ल्ड कप दरम्यान अशी एक घटना झाली होती जी क्रिकेटच्या इतिहासात अमर झाली. या वर्ल्ड कप दरम्यान एक सराव सामना झाला होता. या सामन्यासाठीच्या संघात भारत,पाकिस्तान आणि श्रीलंकेतील खेळाडू होते. संघाचे नाव होते ‘विल्स ११’

वाचा-
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय क्रिकेट सध्या बंद आहे. पण तेव्हा या दोन्ही देशातील खेळाडू एकमेकांच्या सोबत लढले. या संघात , सईद अन्वर, आमिर सोहेल, मोहम्मद अझरूद्दीन, , अनिल कुंबळे, वकार युनूस, एजाज अहमद, अजय जडेजा आदी खेळाडू होते.

वाचा-
श्रीलंकेच्या आर.प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात लंकेचा कर्णधार अर्जुन राणातुंगाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा संघ ४० षटकात १६८ धावात बाद झाला.

वाचा-
लंकेकडून असंका गुरूसिंहाने सर्वाधि ३४ धावा केल्या. तर अर्जुन राणातुंगाने ३२ धावा. विल्स टीमकडून भारताच्या अनिल कुबळेने ८ षटकात १२ धावा देत ४ विकेट घेतल्या.

वाचा-
या सामन्यात पाकिस्तानचा गोलंदाज वसीम अकरमच्या चेंडूवर सचिन तेंडुलकरने एक कॅच घेतला होता. सचिनने लंकेचा फलंदाज रमेश कालुविथराणाचा कॅच घेताल होता. क्रिकेटच्या इतिहासात असे प्रथमच घडले होते की एका पाकिस्तानी गोलंदाजाच्या चेंडूवर भारतीय खेळाडूने कॅच घेतला.

वाचा-

क्रिकेटच्या इतिहासातील या घटनेचा हा दुर्मिळ व्हिडिओ पाहा…

‘विल्स ११’ संघाने हा सामना ४ विकेटनी जिंकला. सचिन तेंडुलकर आणि सईद अन्वर यांनी विल्स संघाची सुरुवात केली. सचिनने या सामन्यात ३६ धावा केल्या. तर मोहम्मद अझरुद्दीने ३२ आणि जडेजाने २८ धावा.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here